कोरोनामुळे मुलानं आईचा मृतदेह स्वीकारला नाही, प्रशासन अंत्यसंस्कार करताना दुरूनच घेतलं दर्शन

कोरोनामुळे मुलानं आईचा मृतदेह स्वीकारला नाही, प्रशासन अंत्यसंस्कार करताना दुरूनच घेतलं दर्शन

कोरोनाग्रस्त आईचं पार्थिव स्वीकारण्यास मुलाचा नकार, 100 मीटर लांबूनच दिला अखेरचा निरोप.

  • Share this:

लुधियाना, 08 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग देशभरात झपाट्यानं वाढत असल्यानं आता नागरिकांच्या मनातही भीतीचं वातावरण आहे. देशभराच जवळपास 5 हजारच्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली आहे. त्यातच एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास मुलानं नकार दिला आहे. 69 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिथे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मुलाकडे सोपवण्यात येणार होतं. प्रशासनानं तशी संपूर्ण तयारी देखील केली मात्र या महिलेचे कुटुंबीय आपल्यालाही कोरोना होईल या भीतीनं पार्थिव घेण्यास आलेच नाहीत. संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णालयाकडून संपूर्ण कुटुंबियांची काळजी घेण्यात येईल असं आश्वासनंही रुग्णालयाकडून देण्यात आलं होतं. तरीही कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या जन्मदात्या आईचं पार्थिव स्वीकारण्यास पोटच्या मुलानं नकार दिला. अशी माहिती लुधियानाच्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

हे वाचा-मृत्यूचं केंद्र बनतंय 'हे' गजबजलेलं शहर, 24 तासांत 731 लोकांचा मृत्यू

या कुटुंबीयांनी महिलेचा मृतदेह न स्वीकारल्यामुळे जिल्हा प्रशासनाला या कोरोनाग्रस्त महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारावेळी कोरोनाचं संसर्ग पसणार नाही याची काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा प्रशासन आणि रुग्णालयाकडून देण्यात आली होती. असं असतानाही पोटच्या मुलानं मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्यानं जिल्हा प्रशासनानं हे अंत्यसंस्कार केल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. अंत्यसंस्कारावेळी मात्र मुलगा आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी 100 मीटर लांबूनच आपल्या आईच्या पार्थिवाला अखेरचा निरोप दिला. ही घटना पंजाबमधील लुधियाना परिसरात घडली आहे. पंजाबमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 76 वर पोहोचली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर.

हे वाचा-3 हजार मृत्यू, 81 हजार लोकं संक्रमित! आज 76 दिवसांनी वुहान पार करणार लक्ष्मणरेखा

 

First Published: Apr 8, 2020 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading