कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत नवे 504 रुग्ण, वाचा कोणत्या राज्यात किती रुग्ण

कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत नवे 504 रुग्ण, वाचा कोणत्या राज्यात किती रुग्ण

देशातमध्ये राज्यांची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र, दिल्ली, केरळ या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे.

  • Share this:

मुंबई, 08 एप्रिल : चीनमधील वुहानमध्ये 76 दिवसानंतर लॉकडाऊन संपला असताना जगभरात मात्र कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. इटली फ्रान्स सारख्या देशांमध्ये हजारोंच्या संख्येनं लोकांचा मृत्यू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर भारतातही आता कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 5 हजार पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशभऱात आतापर्यंत 4 हजार सातशेहून अधिक केसेस अॅक्टीव असल्याचं समोर आलं आहे. तर सर्वात जास्त रुग्ण 1 हजारहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात तर मुंबईत जवळपास 500 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वारंवार प्रशासनाकडून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असतानाही कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात वेगानं वाढताना दिसत आहे. देशभरात 24 तासांत 508 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा-कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या डॉक्टरवरचा ड्यूटीदरम्यान मृत्यू

कोणत्याा राज्यात किती कोरोनाचे रुग्ण जाणून घ्या

महाराष्ट्र- 748 , तमिलनाडु- 621, दिल्ली- 523, केरळ- 327, तेलंगना- 321, उत्तर प्रदेश- 305

आंध्र प्रदेश- 266, राजस्थान- 288, मध्य प्रदेश- 165, कर्नाटक- 151, गुजरात-144, जम्मू-कश्मीर- 109

हरियाणा-90, पश्चिम बंगाल- 91, पंजाब-76

हिमाचल प्रदेश- 13, लडाख- 14, चंडीगड- 18, ओडिसा- 21, आसम- 26, बिहार- 32, उत्तराखंड- 31

मिझोराम-1, अरुणाचल प्रदेश- 1, त्रिपुरा- 1, मणिपुर- 2, झारखंड- 4

पुदुचेरी- 5, गोवा- 7, अंदमान निकोबार -10, छत्तीसगड- 10

देशात 6 राज्यांमध्ये सर्वात जास्त धोका आहे. याच पार्श्वभूमीवर या राज्यांमध्ये नियमही कठोर करण्यात आले आहेत. कोरोनाचा धोका रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू आहेत. देशातल्या सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. गुजरातमध्ये आज एका 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.

हे वाचा-ब्रेड, बिस्कीटमुळे पसरतो कोरोनाव्हायरस? WHO च्या फोटोमागचं तथ्य काय?

संपादन, संकलन- क्रांती कानेटकर.

First published: April 8, 2020, 8:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading