जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कतरीना कैफची बहीण इसाबेलही येणार सिनेमात; या अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूड डेब्यू

कतरीना कैफची बहीण इसाबेलही येणार सिनेमात; या अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूड डेब्यू

कतरीना कैफची बहीण इसाबेलही येणार सिनेमात; या अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूड डेब्यू

कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ (Katrina Kaif Sister) ही आपल्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती कधी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार ह्याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. मात्र आता तो सिनेमा आणि तो हिरोही निश्चित झालाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जानेवारी: अभिनेत्री कतरिना कैफची (Katrina Kaif) बहीण इसाबेल(Isabelle Kaif) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा होत्या. अखेर या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.  इसाबेल पुलकित सम्राटसह (Pulkit Samrat) बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून ‘सुस्वागतम खुशामदीद’ (Suswagatam Khushaamadeed) असं या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटामध्ये पुलकित दिल्लीमधील अमन नावाच्या एका मुलाची भूमिका करणार असून इसाबेल आग्र्यातील नूर नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.

जाहिरात

इनसाइट इंडिया आणि एंडेमोल शाइन इंडिया यांनी यलो अँट प्रोडक्शन्सच्या सहकार्याने सुस्वागतम खुशामदीद (Suswagatam Khushaamadeed) या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनीष किशोर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीविषयी बोलताना पुलकितने आमची केमिस्ट्री खूपच धमाकेदार असल्याचे म्हटले आहे. सेटवरील व्यक्तीनुसार आमची जोडी खूपच फटाका असून इसाबेल खूपच एनर्जीने काम करते. सेटवर तिच्यामुळे खूपच एनर्जी येत असून ती खूप मेहनती आहे. आपल्या भूमिकेसाठी तिने खूपच मेहनत घेतली असून मला प्रभावित केल्याचं देखील पुलकितने म्हटलं. या जोडीने नुकतेच बन पिया (Ban Piya) नावाचे दांडिया गाणे शूट केलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओगग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी याचे दिग्दर्शन केलं असून यामध्ये दोघीनींही उत्तम डान्स केल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये पुलकित हा उत्तम अभिनेता आणि डान्सर आहेच असे त्यांनी म्हटले. परंतु इसाबेलने ज्या पद्धतीने खूपच कमी कालावधीत डान्स स्टेप्स शिकल्या आहेत ते पाहून मी खूपच प्रभावित झाल्याचो गणेश आचार्य यांनी म्हटलं.  या गाण्यामध्ये दोघांचीही केमिस्ट्री अतिशय उत्तम जुळून आली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या गाण्याविषयी बोलताना पुलकित याने या गाण्यामध्ये 400 बॅकग्राउंड डान्सर असून मास्टरजी गणेश आचार्य(Ganesh Acharya) यांनी या गाण्यामध्ये काही नवीन स्टेप शिकवल्या असून हे गाणे प्रेक्षकांना खूपच आवडणार असल्याचे म्हटले. हे देखील वाचा : सुशांतच्या वाढदिवशी बहिणीची अनोखी श्रद्धांजली, केली 25 लाख रुपयांच्या स्कॉलरशिपची घोषणा दरम्यान, या गाण्यामध्ये इसाबेल आणि पुलकित यांनी काळ्या आणि सोनेरी रंगाचे कपडे घातले असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे या गाण्याबरोबरच इसाबेल आणि पुलकित यांच्या सुस्वागतम खुशामदीद (Suswagatam Khushaamadeed) या चित्रपटाची देखील प्रतीक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात