मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vijay Deverakonda: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाला ईडीकडून समन्स; 'हे' आहे कारण

Vijay Deverakonda: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाला ईडीकडून समन्स; 'हे' आहे कारण

विजय देवराकोंडा

विजय देवराकोंडा

विजय देवराकोंडाच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कडून समन्स

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 30 नोव्हेंबर :  साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांत आपल्या 'लायगर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला होता. या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, राम्या कृष्णन, माईक टायसन अशी तगडी स्टारकास्ट असूनदेखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप ठरला. त्यामुळे विजयला बॉलिवूडमध्ये हवी तशी सुरुवात मिळाली नाही. त्यामुळे विजय देवरकोंडासोबत त्याचे चाहतेसुद्धा प्रचंड निराश झाले आहेत. परंतु आता विजय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण विजयला आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कडून  बुधवारी समन्स बजावले आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी  'लायगर' चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, हवालाच्या पैशासह विदेशी निधी चित्रपटात गुंतवल्याची तक्रार ईडीकडे आली होती. याप्रकरणी पुरी जगन्नाथ आणि चार्मीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 'Liger' 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि तो जवळपास 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.

हेही वाचा - Adipurush: 'प्रभू श्रीरामांनीच मला...'; आदिपुरुषमध्ये प्रभासला आवाज देणाऱ्या शरद केळकरचं वक्तव्य चर्चेत

'लायगर' चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन यांसारख्या स्टार्स लीड रोलमध्ये होत्या. या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यात आले होते. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला. सूत्रांच्या हवाल्याने आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा यांच्याकडून चित्रपटासाठी केलेली गुंतवणूक आणि त्याच्या टीमला दिलेल्या पैशांबाबत चौकशी केली जात आहे. तत्पूर्वी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी 17 नोव्हेंबर रोजी चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाध आणि अभिनेत्री-निर्माती चार्मी कौर यांचीही चौकशी केली होती.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे मेगा शूटिंग लास वेगास येथे झाले. या चित्रपटात माईक टायसननेही कॅमिओ केला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही आणि तो फ्लॉप ठरला. तोपर्यंत चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणावर झाले होते. काँग्रेस नेते बक्का जडसन यांनी देखील  चित्रपटात संशयास्पद गुंतवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर ईडीने तपास सुरू केला आहे. राजकारण्यांनीही 'लायगर'मध्ये पैसे गुंतवले असल्याची तक्रार बेका जडसन यांनी केली. त्यांनी दावा केला की गुंतवणूकदारांना त्यांच्या काळ्या पैशाचे पांढरे रूपांतर करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे आता या चित्रपटाशी संबंधित लोकांशी तक्रार होत आहे.

FEMA चे उल्लंघन करून चित्रपट बनवण्यासाठी परदेशातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याच्या आरोपाबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. अनेक कंपन्यांनी चित्रपट निर्मात्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्याला ज्यांनी पैसे पाठवले आणि माईक टायसन आणि तांत्रिक टीमसह परदेशी कलाकारांना पैसे कसे दिले गेले याचा तपशील देण्यास सांगितले होते. आता या केसमुळे विजय देवराकोंडाच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Vijay deverakonda