Home /News /entertainment /

इरफान खानचा दुबई रिटर्न 15 वर्षानंतर प्रदर्शित; या ठिकाणी घ्या चित्रपटाचा मोफत आनंद

इरफान खानचा दुबई रिटर्न 15 वर्षानंतर प्रदर्शित; या ठिकाणी घ्या चित्रपटाचा मोफत आनंद

आता 15 वर्षानंतर हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

    मुंबई 4 जुलै: इरफान खान (Irrfan Khan) हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफानचा दुबई रिटर्न (Dubai Return) हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. खरं तर या चित्रपटाची निर्मिती 2005 साली करण्यात आली होती. परंतु डिस्ट्रीब्यूटर न मिळाल्यामुळं केवळ फिल्म फेस्टिवलमध्येच चित्रपट दाखवला गेला. मात्र आता 15 वर्षानंतर हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, 5 जणांवर गुन्हा दाखल दुबई रिटर्न हा एक विनोदीपट आहे. आदित्य भट्टाचार्य याने या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात इरफानसोबतच रितु शिवपुरी, विजय मौर्या, रझाक खान यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हे सर्व कलाकारा त्याकाळी नवे होते. त्यामुळे दुबई रिटर्नला या चित्रपटाला डिस्ट्रीब्यूटर मिळत नव्हता. मात्र इरफानच्या निधनानंतर अचानक या चित्रपटाची मागणी वाढली. अनेक OTT प्लॅटफॉर्म या चित्रपटाचे हक्क निर्मात्यांकडे मागू लागले. परंतु त्यांनी कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मऐवजी सर्वांसाठी युट्युबवर मोफत हा चित्रपट उपलब्ध केला आहे. दरम्यान काही तासांत 50 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी या चित्रपटाचा आनंद घेतला आहे. बिग बींच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम; पडणार BMC चा हातोडा भारतीय रंचमंच, मालिका आणि चित्रपटांपूरतेच इरफानने स्वत:ला मर्यादीत ठेवले नाही. तर त्यापुढे थेड हॉलिवूडपर्यंत त्याने मजल मारली. ‘द वॉरिअर्स’, ‘अ मायटी हार्ट’, ‘द दार्जिलींग लिमिटेड’, ‘न्यूयॉर्क आय लव्ह यू’ अशा चित्रपटांमधून लहानमोठ्या भूमिका साकारत त्याने हॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले. खरं तर हे चित्रपट तिकीटबारीवर फार काही कमाल करु शकले नाही. मात्र यांमधून इरफान खान नावाचा एक अनोखा अभिनेता संपूर्ण जगासमोर आला.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Irrfan khan, Youtube

    पुढील बातम्या