मुंबई, 25 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. त्यांनी सिंगर हिमेश रेशमियाच्या ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ या सिनेमासाठी एका गाणं गायलं असून काही दिवसांपूर्वीच त्यांचं हे गाणं रिलीज झालं. त्यांना गाण्यासाठी अनेक ऑफरही येत आहेत. त्यानंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल हे रानू यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याच्या तयारीत असून अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिला रानू यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली आहे. याविषयी IANS बोलताना सुदीप्ता म्हणाली, मला या सिनेमाची ऑफर मिळाली आहे मात्र त्याची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे ती मिळल्यानंतर मी हा सिनेमा करायचा की, नाही हे ठरवणार आहे. लता@90 : गानसम्राज्ञींना आवडतात त्यांनीच गायलेली ‘ही’ गाणी! या सिनेमाविषयी ऋषिकेश मंडल सांगतात, रानू मंडल यांचा आत्तापर्यंतचा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्यांच्या बाबत अधिकाधिक जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक आहेत. त्यामुळे हा सिनेमा तयार कराण्याचा निर्णय मी घेतला. अभिनेत्री सुदीप्ताला मी यासाठी विचारलं कारण या सिनेमात रानू यांच्या व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देऊ शकते असं मला वाटतं. तिनं या सिनेमाला होकार दिल्यानंतर बाकी इतर कलाकारांची निवड केली जाणार आहे. दिवसातून 6 वेळा खाणं खाऊनही अशी फिट राहते दीपिका पदुकोण
रानू मंडल यांच्याबद्दल बोलायचं तर रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर आता त्यांचं आणखी एक ‘आदत’ नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘आदत’नंतर रानू मंडल हिमेशसोबत ‘आशिकी में तेरी…’ साठी सुद्धा काम करणार आहे. पैशासाठी आईनेच करु दिला होता बलात्कार, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
आपल्या गाण्याविषयी रानू सांगतात, ‘गाण्यासाठी मी कोणतही शिक्षण घेतलेलं नाही. रेडिओ किंवा टेपवर लता मंगेशकर यांची गाणी ऐकून मी गाणं शिकले आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करु लागले.’ तरुण वयात रानू क्लबमध्ये गात असत पण पुढे लग्न झाल्यावर त्यांच्या सासरच्या विरोधामुळे त्यांना गाणं सोडावं लागलं. सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, फेसबुक पोस्ट झाली VIRAL =============================================================== VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं