पैशासाठी आईनेच करु दिला होता बलात्कार, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

या अभिनेत्रीवर अत्याचार झाले त्यावेळी ती फक्त 15 वर्षांची होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 10:43 AM IST

पैशासाठी आईनेच करु दिला होता बलात्कार, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

मुंबई, 25 सप्टेंबर : आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती असं म्हटलं जातं. मात्र एका अभिनेत्रीच्या आईनं अवघ्या काही पैशांसाठी आपल्या या अभिनेत्रीवर बलात्कार करु दिल्याचा खुलासा तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. हॉलिवूड अभिनेत्री डेमी मूरनं 'गुड मॉर्निंग अमेरिका' या शोमध्ये हा अतिशय खळबळजनक खुलासा केला आहे. फक्त 500 अमेरिकी डॉलर्ससाठी एका वक्तीला डेमीवर बलात्कार करू दिला होता.

डेमीच्या आईला दारुचं व्यसन होतं. त्यामुळे अवघ्या काही पैशांसाठी तिनं आपल्या मुलीवर बलात्कार होऊ दिला. डेमीवर अत्याचार झाले त्यावेळी ती फक्त 15 वर्षांची होती. मात्र एवढं झाल्यानंतरही डेमी आपल्या आईला याबाबत दोषी मानत नाही. ती म्हणते, जर माझी आई त्यावेळी नशेत नसती तर तिनं माझ्यासोबत असं कधी होऊ दिलं नसतं. डेमीच्या या खुलाशामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. ट्विटरवर युजर्स तिला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत तसेच तिला सल्ले सुद्धा देत आहेत.

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

डेमी मूरनं या आधी हार्पर्स बाजारला दिलेल्या एका एका मुलखातीत पूर्वश्रमीचा पती एस्टन कुचर यांच्यासोबतच्या नात्याबाबतही काही खुलासे केले होते. तिनं एस्टनला एका बाथटबमध्ये दोन महिलांसोबत रंगेहात पकडल्याचं तिनं म्हटलं होतं. एस्टन मला धोका देत होता आणि अखेर त्याला मी घटस्फोट दिला.

Appa Anni Bappa Trailer : सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा ‘बाप्पा'

डेमी मूरच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर तिनं एस्टनशी 2005 मध्ये लग्न केलं होतं. त्यांचं हे लग्न 2013 मध्ये तुटलं. डेमीची एकून 3 लग्नं झाली आहेत. तिनं फ्रेडी मूरसोबत 1980मध्ये लग्न केलं होतं त्यानंतर 5 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिनं 1987मध्ये  ब्रूस विल्सश लग्न केलं आणि 2000साली हे दोघं वेगळे झाले. त्यानंतर तिनं 2005मध्ये एस्टन कूचरशी लग्न केलं मात्र तिचं हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही.

मलायका अरोरानं पूर्ण केलं #MakeYourMoov चॅलेंज, अर्जुन कपूरला केलं टॅग

===============================================================

VIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 10:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...