मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नोरा फतेहला डान्स करताना पाहून टेरेन्सनं चक्क मलायाकाला केलं इग्नोर ; VIDEO होतोय व्हायरल

नोरा फतेहला डान्स करताना पाहून टेरेन्सनं चक्क मलायाकाला केलं इग्नोर ; VIDEO होतोय व्हायरल

'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' (India’s BEST Dancer Season 2) रिअॅलिटी शोचा आगामी एपिसोड धमाकेदार असणार आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) या मंचावर पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे.

'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' (India’s BEST Dancer Season 2) रिअॅलिटी शोचा आगामी एपिसोड धमाकेदार असणार आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) या मंचावर पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे.

'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' (India’s BEST Dancer Season 2) रिअॅलिटी शोचा आगामी एपिसोड धमाकेदार असणार आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) या मंचावर पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे.

मुंबई, 28 नोव्हेंबर- 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' (India’s BEST Dancer Season 2) रिअॅलिटी शोचा आगामी एपिसोड धमाकेदार असणार आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) या मंचावर पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे. या शोला प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईस(Terence Lewis) , गीता कपूर (Geeta Kapoor) आणि अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोरा (Malaika Arora) जज करत आहेत.आगामी भागाचा एक मजेदार प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये टेरेन्स मलायकाकडे दुर्लक्ष करतो कारण त्याचा नजर नोराकडे असते. टेरेन्सच्या अशा वागण्यावर गीता कपूर देखील कमेंट करते ज्यामुळे सगळ्यांना हासू अनावर होते.

'इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 2' च्या ओपनिंग प्रोमोमध्ये नोरा फतेहीला स्टेजवर पाहून टेरेन्स लुईस जोरात तिचं स्वागत करतो. नोराला पाहून टेरेन्सच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो म्हणतो, 'वेलकम बॅक नोरा'. यावर गीता कपूर लगेच त्याला म्हणते यासाठी मनीष आहे. मनीष पॉल या शोचा होस्ट आहे. पुढच्या सीनमध्ये नोरा फतेही जबरदस्त पद्धतीने बेली डान्स करताना दिसत आहे. नोराचा डान्स पाहून टेरेन्स नि:शब्द झाल्याचा दिसत आहे. टेरेन्सच्या या कृतीवर गीता कपूर पुन्हा त्याला डिवचते. गीता म्हणते, 'अहो, तोंड बंद करा काका'. गीताच्या या वाक्यावर सर्वजण जोरात हासू लागतात.

यानंतर टेरेन्स नोराला स्टेजवरून आणण्यासाठी स्टेजवर जातो. तेव्हा गीता पुन्हा कमेंट करते की, अरे टेरेन्स तू मलायकाला विसारलास का. यावर टेरेन्स स्पष्टीकरण देत म्हणतो की, तुझा ड्रेस पाहून मी इतका विचलित झालो की मी तुझ्याकडे पाहतच राहिलो.

वाचा : आधी केलं ब्लॉक नंतर व्हाटसअ‍ॅपवरून जुळलं प्रेम, आता Rakhi Sawant पतीसोबत बिग बॉसमध्ये करणार 'सुहागरात'

तेव्हाच मलायका अरोरा नोरा फतेहीला विचारते की, ती टेरेन्सला मिस करते का ? नोरा म्हणते, 'ऑफकोर्स मी त्याला मिस केले. टेरेन्ससोबत नाचताना खूप छान वाटतं. टेरेन्सचे आभार मानताना नोराने त्याचा हात पकडताच, गीता आणि मलायका एकमेकांचा हात धरतात. मनीषही लगेच त्यांच्या हातात देण्यासाठी येतो. यावरून सर्वजण टेरेन्सला चिडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Malaika arora, Nora fatehi, TV serials