मुंबई, 10 फेब्रुवारी: मल्याळम सिनेमा जल्लीकट्टू (Jallikattu) 93 व्या अकॅडमी पुरस्कार 2021 च्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. हा सिनेमा बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये भारताची अधिकृत एंट्री होता. या पुरस्कार सोहळ्यामधेय 93 देशातील सिनेमांनी भाग घेतला आहे, हा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त असा आकडा आहे. जल्लीकट्टूकडून सिनेरसिकांच्या विशेष अपेक्षा होत्या कारण ऑस्करमध्ये जाण्यापूर्वी या सिनेमाने अनेक भारतीय आणि विदेशी पुरस्कार पटकावले आहेत. समीक्षकांची वाहवा देखील या सिनेमाला मिळाली आहे. लिओ जोस पेल्लीसरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, थॉमस पेनिकर जल्लीकट्टूचे निर्माते आहेत. दरम्यान करिश्मा देव दुबे दिग्दर्शित ‘बिट्टू (Bittu)’ कडून अद्यापही चाहत्यांना अपेक्षा आहेत. हा सिनेमा जगभरात 18 फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे. या सिनेमाची प्रशंसा जगभर होत आहे. यामध्ये शाळेत जाणाऱ्या दोन मुलांची मैत्री दाखवण्यात आली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित गलीबॉय हा सिनेमा 2020 च्या 92व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताची अधिकृत एंट्री होता. मात्र हा सिनेमा देखील ऑस्करच्या शर्यतीत मागे राहिला होता.
(हे वाचा- काजल अग्रवाल गंभीर आजारानं त्रस्त, इन्स्टाग्रामवर केला खुलासा ) जल्लीकट्टूबद्दल… हा सिनेमा केरळ-तामिळनाडू राज्यात भरवल्या जाणाऱ्या वादग्रस्त स्पर्धा ‘जल्लीकट्टू’वर आधारित आहे. हा सिनेमा एक थ्रीलर ड्रामा आहे. कलन वर्की नावाचा एक कसाई आहे, ज्याच्याकडून संपूर्ण गावामध्ये मांस पुरवले जाते. तेव्हा त्याच्याइथून मांस देणारा रेडा पळून जातो आणि त्याला पकडण्यासाठी संपूर्ण गाव कामाला लागतो. या मुळ कथानकाबरोबरच गावातील गरिबी, शिक्षणाची कमतरता आणि बेरोजगारी अशा काही समस्या देखील यातून मांडण्यात आल्या आहेत. (हे वाचा- ‘अमृतापासून वेगळं होणं हे…’, 16 वर्षांनंतर सैफने व्यक्त केलं दु:ख ) 06 सप्टेंबर 2019 मध्ये सर्वात आधी या सिनेमाचा प्रीमियर टोरंटो इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला होता. 4 ऑक्टोबर 2019 मध्ये हा सिनेमा केरळमध्ये प्रदर्शित करण्यात आला. भारतातच नव्हे या सिनेमाने परदेशातही या कौतुकाची थाप मिळवली आहे. 63व्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमदध्ये 78 देशांतून निवडण्यात आलेल्या 229 सिनेमांपैकी ‘जल्लीकट्टू’ एक होता. यामध्ये अँटोनी व्हर्गिस (Antony Varghese),चेंबन विनोद जोस (Chemban Vinod Jose) आणि सबुमोन अब्दूसामद (Sabumon Abdusamad) यांचा दमदार अभिनय आहे.