जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kajal Aggarwal नं केलाय गंभीर आजाराचा सामना, स्वतःच केला खुलासा

Kajal Aggarwal नं केलाय गंभीर आजाराचा सामना, स्वतःच केला खुलासा

Kajal Aggarwal नं केलाय गंभीर आजाराचा सामना, स्वतःच केला खुलासा

अभिनेत्री काजल अग्रवालला(Kajal Aggarwal) वयाच्या पाचव्या वर्षीच एका गंभीर आजारानं ग्रासलं आहे. अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 10 फेब्रुवारी : सोशल मीडियावरुन कलाकार आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहातात आणि वेळ आल्यावर आपल्या जीवनातील संघर्षदेखील चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकतंच अभिनेत्री काजल अग्रवालनंही (Kajal Aggarwal) इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला असून यात ती पांढऱ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये काजलनं त्यावेळची गोष्ट सांगितली आहे, जेव्हा तिला अस्थमा (Asthma) असल्याचं समजलं होतं. अभिनेत्री यावेळी केवळ 5 वर्षांची होती. अभिनेत्रीनं सांगितलं, की याबद्दल माहिती होताच जीवनात अनेक बदल झाल्याचं तिला जाणवू लागलं. पाच वर्षांची असतानाच काजलच्या आहारात अनेक बदल केले गेले. याच कारणामुळं तिला चॉकलेटपासूनही लांब राहावं लागलं. काजलनं पुढं लिहिलं, की हे सोपं नव्हतं. थंडीच्या महिन्यातील आठवण सांगताना काजल म्हणाली, की मी यासाठी अजिबातही तयार नव्हते. धुळ आणि धुरदेखील तिचे सर्वात मोठे शत्रू बनले होते. काजलनं सांगितलं, की धूळ किंवा थंडीसारख्या साधारण गोष्टीही तिच्या शरीरावर मोठा परिणाम करतात. याच काळात तिनं इनहेलरचा (Inhalers) वापर करण्याचा निर्णय घेतला आणि तिला मोठा बदल जाणवला. काजलनं लिहिलं, की इनलेहर एक अशी वस्तू आहे, जी मी नेहमी माझ्या बॅगमध्ये ठेवते. अभिनेत्री म्हणाली, की देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांना इनहेलरची गरज आहे.

जाहिरात

आपली स्टोरी शेअर करतानाच, काजलनं अस्थमा आणि इनहेलरच्या उपयोगाबद्दल जागरुकता केली. ती आपल्या चाहत्यांना म्हणाली, आज मी म्हणते, #SayYesToInhalers आणि मी माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबाला आग्रह करते, की त्यांनीही यात सामील व्हावं. आपल्याला इतरांची मदत करायला हवी. अस्थमाबद्दल जागरुकता करणं आणि इनहेलरचा वापर वाढवण्यासाठी आपण मदत करू शकतो, असंही तिनं म्हटलं. कामाबद्दल बोलायचं झाल्यास काजल अग्रवाल आता वेंकट प्रभूद्वारा दिग्दर्शित आपला डिजीटल डेब्यू असलेल्या लाइव टेलिकास्टच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. ही हॉरर वेबसीरिज 12 फेब्रुवारीला डिजनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात