मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

TRP मीटर : प्रेक्षक म्हणताहेत राणादा 'तुझ्यात जीव रंगला', 'या' मालिकेनं गमावलं आपलं स्थान

TRP मीटर : प्रेक्षक म्हणताहेत राणादा 'तुझ्यात जीव रंगला', 'या' मालिकेनं गमावलं आपलं स्थान

TRP rating, Tuzyat Jiv Rangala, Mazya Navryachi Bayako - टीआरपी रेटिंगमध्ये याही वेळी बरंच वेगळं चित्र पाहायला मिळालं. प्रेक्षकांचा कल बदलतोय

TRP rating, Tuzyat Jiv Rangala, Mazya Navryachi Bayako - टीआरपी रेटिंगमध्ये याही वेळी बरंच वेगळं चित्र पाहायला मिळालं. प्रेक्षकांचा कल बदलतोय

TRP rating, Tuzyat Jiv Rangala, Mazya Navryachi Bayako - टीआरपी रेटिंगमध्ये याही वेळी बरंच वेगळं चित्र पाहायला मिळालं. प्रेक्षकांचा कल बदलतोय

मुंबई, 25 जुलै : दर गुरुवारी गेल्या आठवड्याची टीआरपी समोर येतो. हल्ली दर आठवड्याला वेगळं चित्र पाहायला मिळतंच मिळतं. याही आठवड्यात आलेल्या टीआरपी रेटिंगमध्ये अशीच काही आश्चर्य पाहायला मिळाली.

गेला आठवडा तुला पाहते रे मालिकेचा शेवटचा आठवडा होता. त्यामुळे ही मालिका जास्त पाहिली जाईल, असं वाटत होतं. मालिकेनं यावेळी 5वं स्थान पटकावलंय. एके काळी ही मालिका कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या स्थानावर असायची. पण जसजशी ही मालिका संपायला लागली होती, तसा मालिकेतला चार्म संपत चाललेला. शेवट तर फारच गुंडाळल्यासारखा झाला. अचानक विक्रांत सरंजामेला पश्तात्ताप होतो काय, तो ईशावरचं प्रेम व्यक्त करतो काय आणि राजनंदिनीला ढकललं तसा गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करतो काय... सगळंच वेगवान आणि बालिश वाटलं. प्रेक्षकांचाही मालिकेतला रस कमी झाल्याचं कळत होतं.

‘सेक्स’वर बोलणार सोनाक्षी सिन्हा, ट्विटरवर शेअर केला नंबर

प्रेक्षक इतिहासाला पसंती देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका चौथ्या नंबरवर आलीय. या मालिकेत गेल्या आठवड्यात सोयरा मातोश्रींना होणारा पश्चात्ताप आणि त्यांचा मृत्यू हे फारच सुंदरपणे साकारलं गेलं. अनेक प्रेक्षकांच्या काळजाला या प्रसंगानं हात घातला. अभिनेत्री स्नेहलता वसईकरची भूमिका अक्षरश: जीव तोडून केलेली जाणवली. त्याच आठवड्यात संभाजी महाराज आणि सोयराबाई यांची झालेली भेटही चांगलीच रंगली होती.

धक्कादायक ! डोक्याला गंभीर इजा झाल्यानं 6 महिने झाला होता मेमरी लॉस - दिशा पाटनी

चला हवा येऊ द्या हा शो घराघरात पाहिला जातो. नेहमीच हा शो रेटिंगमध्ये पहिल्या पाचात असतो. पण यावेळी तो तिसऱ्या नंबरवर आलाय. यातला शेलिब्रिटी पॅटर्न लोकांना आवडतोय. झी मराठीच्या मालिकेतलेच कलाकार येऊन मस्त काॅमेडी करतात. बिग बाॅस मराठीच्या वेळेतच हा शो सुरू असतो. बिग बाॅस मराठी अजूनही पहिल्या पाचात आलेला नाही.

दर वेळी पहिल्या नंबरवर असलेली माझ्या नवऱ्याची बायको या वेळी चक्क दुसऱ्या नंबरवर आलीय. गेल्या आठवड्यात गुरूची वाईट अवस्था, राधिका-सौमित्रला एकत्र आणण्याचा इतरांचा प्रयत्न या सगळ्यात तोचतोचपणा येतोय. पुन्हा गुरू आणि शनायाचे सिनही कमी झाल्यानं हा परिणाम झाला असावा. पण खरं कारण अर्थातच राणादा आहे.

मुलगी जन्मल्यानंतर समीरा रेड्डीची भावुक पोस्ट, ब्रेस्टफिडिंगबद्दल म्हणाली...

तुझ्यात जीव रंगला मालिका नंबर वन झालीय. राजा बनून आलेला राणादा लोकांना आवडतोय. त्याचं बदललेलं रूप, अंजली समोर आल्यावर त्याचे बदलणारे भाव, त्याची लोकोपयोगी कामं सगळं प्रेक्षकांना आवडतंय, असं वाटतं. राणादाच्या मेकओव्हरनं शनायाची वाट लावली म्हणायला हरकत नाही.

पुन्हा एकदा यावेळच्या TRP रेटिंगमध्ये झी मराठीनंच बाजी मारली. गेल्या वेळी कलर्स मराठीची बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका नंबर 5वर आली होती पण टिकली नाही. आता झी मराठीवर अग्गंबाई सासूबाई ही मालिका सुरू झालीय. सासूचं लग्न सून लावते ही संकल्पनाही हटके आहे. कदाचित पुढच्या वेळी ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये स्थान पटकावेल. पण अजूनही जास्त पाहिल्या जाणाऱ्या स्टार प्रवाहवरची जीवलगा, बिग बाॅस मराठी पहिल्या पाचात येत नाहीत याचं आश्चर्य वाटतं.

VIDEO: भररस्त्यात दोन बैलांच्या झुंजीचा थरार CCTVमध्ये कैद

First published:

Tags: Trp rating