आमिरच्या 'या' हिरोईनवर अभिनेता इम्रान खानचा जडला होता जीव, मुलाखतीत केला खुलासा

इम्रान खान पत्नी अवंतिका मलिकशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. मात्र अवंतिकाच्या अगोदर इम्रानचं बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर जीव जडला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 08:13 AM IST

आमिरच्या 'या' हिरोईनवर अभिनेता इम्रान खानचा जडला होता जीव, मुलाखतीत केला खुलासा

मुंबई, 29 सप्टेंबर : अभिनेता आमिर खानचा भाचा इम्रान खान मागच्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. इम्रान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्यात वाद सुरू असून ते लवकरच घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. बरीच वर्ष एकमेकांना डेट करुन नंतर लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. मात्र अवंतिकाच्या अगोदर इम्रानचं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर जीव जडला होता. ही अभिनेत्री त्याचा मामा आमिर खानच्या सिनेमाची हिरोईन जुही चावला होती आणि तिच्यासोबत एका सिनेमात कामही केलं होतं.

इम्रान खाननं एका मुलाखतीत त्याला अभिनेत्री जुही चावलावर प्रेम जडलं होतं या गोष्टीचा खुलासा स्वतःच केला होता. इम्रान खान कयामत से कयामत तक सिनेमाच्या शूटिंग दरम्यान जुही चावलावर लट्टू झाला होता. या सिनेमात इम्राननं आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकरली होती आणि याचवेळी जुही त्याच्या हृदयात बसली. इम्रानला अनेकदा वाटायचं की या सिनेमात मामा ऐवजी सगळीकडे मी असायला हवं होतं.

रानू मंडलनी उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं नवं गाणं, पाहा EXCLUSIVE VIDEO

इम्रान सांगतो, 'मला जुही चावला प्रचंड आवडायची आणि जेव्हा मी माझ्या मामाचे सिनेमा पाहत असे त्यावेळी मला त्याच्या जागी मी असावं असं वाटत असे.' जुहीच्या प्रेमात इम्रान त्यावेळी एवढा वेडा होता की, त्यानं 'कयामत से कयामत तक'च्या सेटवर जुहीला एक अंगठी देत तिला प्रपोज केलं होतं आणि विशेष म्हणजे जुहीनं सुद्धा ती अंगठी घेऊन इम्रानचं प्रेम स्वीकार केलं होतं. लहानग्या इम्रानचा इनोसन्स तिला खूप भावला होता.

Loading...

पहिलं प्रेम, पहिली डेट... सुशांत सिंह राजपूतनं उलगडलं 'लव्ह लाइफ सीक्रेट'

 

View this post on Instagram

 

Love this picture! Repost @avantika_khan

A post shared by Imran Khan (@imrankhan) on

इम्रान खाननं पुढे जाऊन त्याची बालमैत्रीण अवंतिका मलिकशी लग्न केलं. इम्रान आणि अवंतिकाने आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011 मध्ये लग्न केलं. इम्रानच्या लग्नात आमिर खान आणि किरण रावसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दोघांना एक मुलगी असून 2014 मध्ये तिचा जन्म झाला होता. पण सध्या दोघांच्या नात्यात दुरावा आला असून अवंतिका इम्रानचं राहतं घर सोडून माहेरी गेली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात इम्रानला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले असता त्यानं यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.

सोशल मीडियावर सक्रिय असतात लता दीदी, कोण करतं त्यांचे ट्वीट घ्या जाणून

=========================================================

Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...