जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पहिलं प्रेम, पहिली डेट... सुशांत सिंह राजपूतनं उलगडलं 'लव्ह लाइफ सीक्रेट'

पहिलं प्रेम, पहिली डेट... सुशांत सिंह राजपूतनं उलगडलं 'लव्ह लाइफ सीक्रेट'

पहिलं प्रेम, पहिली डेट... सुशांत सिंह राजपूतनं उलगडलं 'लव्ह लाइफ सीक्रेट'

प्रोफेशनल लाइफसोबत सुशांत त्याच्या पर्सनल लाइफमुळेही सतत चर्चेत असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत बॉलिवूडचा हॅन्डसम हंक म्हणून ओळखला जातो. टीव्हीनंतर या अभिनेत्यानं सिने जगतातही चांगलाच जम बसवला आहे. प्रोफेशनल लाइफसोबत सुशांत त्याच्या पर्सनल लाइफमुळेही सतत चर्चेत असतो. नुकतंच इंडिया टुडे माइंडरॉक्स 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतनं त्याची लव्ह लाइफ सिक्रेट सांगितली.  इंडिया टुडे माइंडरॉक्स 2019च्या What Bollywood Taught Me या सेशनमध्ये तो सहभागी झाला होता. यावेळी सुशांतनं त्याच्या पर्सनल लाइफबद्दल बरेच खुलासे केले. या मुलाखतीत पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना सुशांत म्हणाला, मला चौथ्या इयत्तेत असताना पहिलं प्रेम आणि खरं प्रेम झालं होतं. मला माझी क्लास टीचर खूप आवडायची.  पण मी आता पर्यंत स्वतःहून जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो असं कोणालाही बोललो नाही. मी खूप लाजाळू आहे. राखी सावंतनं पहिल्यांदाच शेअर केला पतीचा फोटो, पण त्यातही आहे अनोखा ट्विस्ट

जाहिरात

सुशांत पुढे म्हणाला, मी आज पर्यंत कोणालाही प्रपोज केलेलं नाही. 9 वी ला असताना मला एका मुलीनं पहिलं प्रपोज केलं. त्यानंतर मला 5 वर्ष लागली तिला हो बोलण्यासाठी. मी पहिल्यांदा डेटवर गेलो त्यावेळी मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो. तोपर्यंत माझ्याकडे पैसे नसत जेव्हा मी कॉलेजला गेलो त्यावेळी मी भविष्यात इंजिनिअरिंग करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुलांचे ट्यूशन घेत असे त्यामुळे मला पैसे मिळत असतं. त्यातूनच मी बाइक घेतली. माझ्या पहिल्या डेटवर मी आलू पराठे खाण्यासाठी मुरथलला गेलो होतो. साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण…

जाहिरात

सुशांत सिंह राजपूतचं अंकिता लोखंडेसोबतचं अफेअर खूप गाजलं होतं. त्यानंतर त्याच्या ब्रेकअपनं सर्वांनाच निराश केलं. त्यानंतर सुशांतचं नाव त्याची को-स्टार कृती सेननशी जोडलं गेलं होत. नंतर तो सारा अली खानशी रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र अलिकडच्या काळात त्याचं नाव अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी जोडलं जात आहे. सुशांतनं या सर्व अफवा असल्याचं म्हटलं असलं तरीही हे दोघं नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. KBC मधील फक्त 10 हजार रुपये जिंकून बाहेर पडली अमिताभ बच्चन यांची ‘बहिण’ ============================================================================ साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात