सोशल मीडियावर सक्रिय असतात लता दीदी, कोण करतं त्यांचे ट्वीट घ्या जाणून

सोशल मीडियावर सक्रिय असतात लता दीदी, कोण करतं त्यांचे ट्वीट घ्या जाणून

वयाच्या नव्वदीतही लता दीदी सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. मात्र त्याचे ट्वीट कोण करतं हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दीदी फक्त भारतातच नाही तर परदेशातही खूप लोकप्रिय आहेत. आज लता दीदी 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. लता दीदींचा जन्म मध्यप्रदेशच्या इंदौर शहारातील एका मराठी कुटुंबात झाला. वयाच्या नव्वदीतही लता दीदी सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. मात्र त्याचे ट्वीट कोण करतं हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. लता दीदींची लहान बहिण मीनाताई मंगेशकर यांनी नुकत्याच एका मुलाखीती लता दीदी दिवसाभरात काय काय करता आणि सोशल मीडियावरील त्यांचे ट्वीट कोण करत याविषयीचा खुलासा केला.

'आज तक' वेबसाइटनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मीनाताईंनी 90 वर्षीय लता दीदींच्या रोजच्या दिनक्रमाविषयी नुकत्याच दिलेल्या  मुलाखतीत अनेक खुलासे केले. मीनाताई सांगतात, दीदी पूर्ण दिवस गातात मात्र त्या पूर्वी प्रमाणे तानपुरा घेऊन रियाज करत नाही, त्या स्वतः जेवण बनवतात आणि सर्व मुलांना जेवू घालतात. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या स्वतःच सर्व ट्वीट करतात. यासाठी त्यांनी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला मदतनीस म्हणून ठेवलेलं नाही.

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

मीनाताई पुढे म्हणाल्या, जेव्हा आशाताईंची मुलं येतात त्यावेळी दीदी स्वतःच्या हातानं त्या मुलासाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवतात. आजही त्या आम्हाला पूर्वी सारखंच संभाळतात. आम्हालाही काही समस्या असेल तर आम्ही त्यांच्याकडे जातो. हृदयनाथ यांना तर त्या आपला मुलगा मानतात. आई-बाबा गेल्यानंतर दीदींनी त्याची जागा घेतली. तेव्हा पासून तिच आमची आई आणि तिच आमचे बाबा आहे. आम्ही काही चुकीचं वागलो तर दीदींना वाईट वाटतं. त्या याचा राग स्वतःवरच काढतात. जेव्हा आम्ही बहीणी आपापसात भांडत असू त्यावेळी त्या आम्हाला नेहमी समजावत असत.

KBC मधील फक्त 10 हजार रुपये जिंकून बाहेर पडली अमिताभ बच्चन यांची 'बहिण'

मीनाताईंनी लग्नानंतर गाणं सोडलं. याविषयी तुम्हाला लता दीदींनी तुम्हाला गाणं गाण्याचा सल्ला दिला नाही का असं विचारल्यावर मीनाताई म्हणाल्या, नाही मला दीदी म्हणाल्या तू ठीक केलंस. तुझं लग्न झालं आहे. जर तुला गायचं नसेल तर नको गाऊ. पण दुसरं काहीतरी कर जर तुला करावंसं वाटत असेल तर. त्यावर मी म्यूझिक डायरेक्शन सुरू केलं. लहान मुलांची गाणी तयार केली. रचना आणि दीपक माझी मुलं लहान होती त्यामुळे मी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. त्यावेळी आशाताई किंवा दीदी लहान मुलांची गाणी गात असत. पण त्यांचा आवाजात अपेक्षिक असलेला तो भाव नव्हता असं मला वाटत होतं.

रणबीरचे VIRAL PHOTO ठरले वादग्रस्त, बॉलिवूडमध्ये उडाली होती खळबळ

===================================================================

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

Published by: Megha Jethe
First published: September 28, 2019, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading