Home /News /entertainment /

सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले होते संकेत? व्हायरल होतायेत TWEET चे स्क्रिनशॉट

सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले होते संकेत? व्हायरल होतायेत TWEET चे स्क्रिनशॉट

सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्वीट करून ते डिलीट केल्याचा दावा केला जातो आहे. त्या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    मुंबई, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. तो डिप्रेशनमध्ये होता याची माहिती मिळते आहे, मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्याचा तपास सुरू आहे. मात्र आता सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी ट्वीट केलं होतं (sushant singh rajput tweet) आणि त्याने ट्विटरवर आत्महत्येचे संकेत दिले होते, असा दावा केला जातो आहे. सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी तीन ट्वीट केले होते. मात्र ते त्याने नंतर डिलीट केले असं सांगितलं जातं आहे. या ट्वीटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होत आहेत. व्हायरल होणाऱ्या या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "आम्हा पुरुषांना आमचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आमच्या विचारांबाबत काहीच विचारलं जात नाही. मी या सर्व परिस्थितीतून गेलो आहे आणि आता प्रयत्न करून थकलो आहे. तुम्हा सर्वांसोबत माझा प्रवास खूप मोठा होता. मला मला नाही माहीत मी हे ट्वीट का करत आहे" तर दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "मी माझ्या आयुष्यातील समस्यांशी लढून थकलो आहे. काही वेळाने मी हे ट्वीट डिलीट करेन. मी या mediocre  सक्सेसमुळे थकलो आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती व्हावं, असं मला वाटतं. मला आता फेम नकोय, खूप आरामदायी असेल हे मात्र ते झेलणं खूप कठीण आहे" "मी आता हे सर्व संपवत आहे. एका चांगल्या शेवटासाठी मी आता दूर जातो आहे मात्र तुम्हा सर्वांसोबत राहण्यासाठी. कदाचित यानंतर लोकं बोलणं सुरू करतील, आपल्या विचारांना आपल्या मनातच ठेवणं बंद करतील. भेटू, जगाच्या दुसऱ्या टोकाला. गूड बाय", असं शेवटचं ट्वीट आहे. हे वाचा - "सुशांतच्या आत्महत्येला सोनमही जबाबदार"; या VIDEO वरून सोनम कपूरही होतेय ट्रोल India.com च्या रिपोर्टनुसार व्हायरल होणारं हे ट्वीट फेक आहे. सुशांत सिंह राजपूतच्या टीमला विचारणा करण्यात आली. हे ट्वीट फेक असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान सुशांतने हे ट्वीट डिलीट केले यातही तथ्य नाही. सुशांतने असं कोणतंही ट्वीट केलं नव्हतं. #JusticeForSushantSinghRajput या हॅशटॅगसह या हे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधल्या नेपोटिझमला जबाबदार मानलं जातं आहे.  ट्वीटर युझर्स सुशांतसाठी न्याय मागत आहेत. संकलन, ंसंपादन - प्रिया लाड हे वाचा - माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला, सुशांतच्या आठवणीत कृती सेनन झाली भावुक
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput, Tweet, Viral

    पुढील बातम्या