मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Hruta Durgule: हृताच्या डोळ्यात हरवला प्रतीक; महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीने अशी साजरी केली पहिली संक्रांत

Hruta Durgule: हृताच्या डोळ्यात हरवला प्रतीक; महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीने अशी साजरी केली पहिली संक्रांत

हृता दुर्गुळे

हृता दुर्गुळे

देशभरात नुकतंच मकरसंक्रांती हा सण मोठ्या उत्साहात पार पडला. परंतु या सणाचा उत्साह अजून दिसून येत आहे. नववधू महिनाभर आपापल्यापरीने हा सण साजरा करत असतात. यामध्ये महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेसुद्धा मागे नाहीय.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 27 जानेवारी-  देशभरात नुकतंच मकरसंक्रांती हा सण मोठ्या उत्साहात पार पडला. परंतु या सणाचा उत्साह अजून दिसून येत आहे. नववधू महिनाभर आपापल्यापरीने हा सण साजरा करत असतात. यामध्ये महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेसुद्धा मागे नाहीय. हृताने लग्नानंतर आपली पहिली मकर संक्रांती साजरी केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

'फुलपाखरु', 'मन उडू उडू झालं' या मालिकांच्या माध्यमातून हृता घराघरात पोहोचली आहे. या मालिकांमुळे हृताचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सुंदर, निखळ असणाऱ्या हृताला महाराष्ट्राची क्रशदेखील जातं. हृताच्या आयुष्यासोबतच तिच्या खाजगी आयुष्याबाबतही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. हृता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच हृताने लग्नानंतरच्या आपल्या पहिल्या संक्रांतीची झलक दाखवली आहे.

(हे वाचा:Ruturaj Phadke:'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर; पार पडला साखरपुडा )

अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात. हृता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध लहान-मोठ्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष लागून असतं. आता हृताची पोस्ट चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला आणि पती प्रतीकचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हे जोडपं फारच आनंदात दिसत आहे. हृताने फोटो शेअर करत आपली पहिली मकरसंक्रांती असल्याचं सांगितलं आहे. काळी काठपदर साडी, हलव्याचे सुंदर दागिने यामध्ये हृताचं सौंदर्य आणखीनच खुलुन दिसत आहे. फोटोमध्ये हृतासोबत पती प्रतीकसुद्धा आहे.

हृताने काही महिन्यांपूर्वी हिंदी दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत साखरपुडा करत सर्वांनाच सुखदः धक्का दिला होता. त्यांनंतर काही दिवसांतच हृता आणि प्रतीकने लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाची झाली होती. हृताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सोबतच हे नवं जोडपं टर्कीला हनिमूनसाठी गेलं होतं. त्यांचे टर्कीमधील फोटो समोर येताच व्हायरल झाले होते.

First published:

Tags: Entertainment, Makar Sankranti 2023, Marathi actress, Marathi entertainment