जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ…..रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हळदी कुंकवा दिवशी ….चे नाव घेते, सौभाग्य माझे. मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी, …रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी. कपाळावर कुंकू,हिरवा चुडा हाती, ….राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती. सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास, ….रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस. जमल्या साऱ्या जणी हळदी कुंकूवाच्या निमित्ताने संसाराचा गाडा उचलेन ….रावांच्या साथीने दिवाळी होती म्हणून, बनवले करंजीचे सारण, ….रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंचे कारण.
गळ्यात मंगळसूत्र, हि पतिव्रतेची खून, ….रावांचे नाव घेते …. ची सून. संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान …. रावांच्या जीवावर देते हळदीकुंकाचं वाण. हळदी कुंकूवासाठी, जमल्या साऱ्या बायका, …. रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका. हळदी कुंकूला आल्या, साऱ्या महिला नटून, …. रावांनी आणलेली साडी दिसते, सर्वात उठून.
चांदीच्या ताटात रेशमी खण …. रावांच नाव घेते हळदी कुंकवाचा सन. वडिलांची माया आणि आईची कुशी, …. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूवाच्या दिवशी. कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा …. रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा.