मुबई, 27 जानेवारी-
‘मन उडू उडू झालं’
या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक म्हणजेच अभिनेता
ऋतुराज फडके
होय. ऋतुराज फडकेने या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या इंद्राच्या भावाची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेला ऋतुराजने उत्तम न्याय दिला होता. नकारात्मक भूमिका असूनदेखील कार्तिकच्या माध्यमातून ऋतुराजला प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा एक खास चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. अभिनेत्याचा नुकतंच साखरपुडा पार पडला आहे. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. ही मालिका सतत टीआरपीच्या शर्यतीत पुढे असायची. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र आजही प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम देत आहेत. मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या दोघांभोवती फिरणारी ही मालिका असली तरी, मालिकेतील सर्वच कलाकारांना तितक्याच महत्वाच्या भूमिका होत्या. त्यातीलच एक भूमिका म्हणजे कार्तिकची होय. ऋतुराज फडकेने ही भूमिका साकारली होती. **(हे वाचा:**
Akshay Kelkar: थाटात पार पडला अक्षय केळकरच्या बहिणीचा लग्नसोहळा; समृद्धी ते अमृता धोंगडेने लावली हजेरी
) ऋतुराज फडकेने नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना खुश खबर दिली आहे. ऋतुराज आता नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. अभिनेत्याने नुकतंच आपला साखरपुडा पार पाडला. ऋतुराज फडकेने प्रितीसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या साखरपुड्याची सुंदर फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमात पारंपरिक अंदाजात हे जोडपं फारच सुंदर दिसत होतं. काही दिवसांपूर्वी ऋतुराज फडकेने ‘झोलझाल’ या मराठी सिनेमामध्ये काम केलं होतं. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी ऋतुराज फारच उत्साहात दिसून आला होता.अभिनेता सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ऋतुराजचा झोलझाल सिनेमा पाहण्याची प्रेमळ विनंती प्रेक्षकांना केली होती.
‘झोलझाल’ या विनोदी मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन मानस कुमार दास यांनी केलं होतं. या चित्रपटात ऋतुराजसोबत अजिंक्य देव, सयाजी शिंदे,मनोज जोशी, मंगेश देसाई, कुशल बद्रिके, अमोल कागणे अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली होती.