मुंबई, 24 ऑगस्ट : महाराष्ट्राची लाडकी क्रश अर्थात सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. टेलिव्हिजन, रंगभूमी आणि सिनेमाच्या माध्यातून हृतानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. टाईमपास 3 आणि अनन्या या दोन दमदार सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. अभिनय आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनीसाठी हृताचं प्रचंड कौतुक होत आहे. नुकतंच हृताचं लग्न देखील झालं. या सगळ्यात हृतानं तिच्या लाडक्या प्रेक्षकांनी आणखी एक मोठ सप्राइज दिलं आहे. टेलिव्हिजन, रंगभूमी आणि सिनेमानंतर हृता आता ओटीटीवर पदार्पण करत आहे. हृताच्या पहिल्या वहिल्या वेब सीरिजची नुकतीच घोषणा झाली असून अभिनेत्रीनं वेब सीरिजचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हृता अभिनय क्षेत्रातआल्यापासून नेहमीच वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न करत आली आहे. तिच्या पहिल्या वेब सीरिजचं नावही काहीसं आगळं वेगळं आहे. हृताची ‘एका काळेचे मणी’ ही नवी कोरी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये एका चित्र विचित्र फॅमिलीची आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हृताचा एक नवा अवतार यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला पाहता येणार आहे. हेही वाचा - Hruta Durgule: हृतानं खरंच गुजराती नवरा केलाय का? अभिनेत्रीनं केला खुलासा
एका काळेचे मणी ही नवी वेब सीरिजची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि जिओ स्टुडिओज यांनी केली आहे. अभिनेता समीर चौघुले, विशाखा सुभेदार, ऋता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर आणि प्रशांत दामले यांचीही धम्माल वेब सीरिज आहे. वेब सीरिजमध्ये हृतासह अभिनेते प्रशांत दामले, रिशी मनोहर, पूर्णिमा मनोहर, ऋतुराज शिंदे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हेही वाचा - Hruta Durgule: हृताला अजिबात करायला आवडत नाही ‘ही’ गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितलं आपलं सिक्रेट वेब सीरिजमध्ये अभिनेत्री हृता ‘मीरा काळे’ ही भूमिका साकारणार आहेत. तर प्रशांत दामले यांच्या व्यक्तिरेखचं नाव श्रीनिवास काळे असं आहे. तर पौर्णिमा मनोहर या अनुराधा काळे, रिशी मनोहर हा विवास्वान काळे आणि ऋतुराज शिंदे हा अर्जुन ही भूमिका साकारणार आहे. ही वेब सीरिज म्हणजे एका क्रेझी फॅमिलीची हटके स्टोरी असणार आहे. पण कधी कधी ही फॅमिली थोडी क्रेझी वाटत असली तरी यातील सगळेच फुल टू शहाणे आहेत. अशा अतरंगी कुटुंबाचा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.