जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Hruta Durgule: हृताला अजिबात करायला आवडत नाही 'ही' गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितलं आपलं सिक्रेट

Hruta Durgule: हृताला अजिबात करायला आवडत नाही 'ही' गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितलं आपलं सिक्रेट

Hruta Durgule: हृताला अजिबात करायला आवडत नाही 'ही' गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितलं आपलं सिक्रेट

‘टाईमपास 3’ आणि ‘अनन्या’ या आपल्या डेब्यू चित्रपटांमुळे अभिनेत्री हृता दुर्गुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 ऑगस्ट-   ‘टाईमपास 3’ आणि ‘अनन्या’ या आपल्या डेब्यू चित्रपटांमुळे अभिनेत्री हृता दुर्गुळे प्रचंड चर्चेत आली आहे. विविध धाटणीच्या असणाऱ्या या दोन्ही चित्रपटांमध्ये हृताने उत्तम भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुकदेखील होत आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिला महाराष्ट्राची क्रशदेखील म्हटलं जातं. दरम्यान अभिनेत्रीने आपल्याबाबतचं एक सिक्रेट उघड केलं आहे. पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय. झी मराठीवरील ‘मन उडू उडू’ झालं या मालिकेत हृता दुर्गुळे सध्या झळकत आहे. ही मालिका लवकरच बंद होणार आहे. परंतु या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील इंद्रा आणि दीपूची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली आहे. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका बंद होऊ नये अशी मागणीही प्रेक्षक करत आहेत. तत्पूर्वी अभिनेत्रीने मराठी चित्रपटातूनही पदार्पण केलं आहे. आधी अनन्या आणि नंतर टाईमपास 3 अशी तिची लागोपाठ 2 सिनेमे भेटीला आली होती.

hruta Durgule with her mother in law

या चित्रपटांसाठी हृता दुर्गुळेनं जोरदार प्रमोशन केलं होतं. प्रमोशनसाठी हृताने अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. यावेळी अभिनेत्रीने फक्त व्यावसायिकच नव्हे तर आपल्या खाजगी आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान अभिनेत्रीने एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आलं होतं, ‘अशी कोणती गोष्ट आहे जी हृताला करायला अजिबात आवडत नाही?’ यावर क्षणाचाही विलंब न करता अभिनेत्रीने पटकन ‘मला भांडी घासायला अजिबात आवडत नाही’. असं म्हटलं होतं. यावरुन अनेक मजेशीर प्रतिक्रिया मिळत आहेत. **(हे वाचा:** अभिनेत्रीनं आपलं स्वप्न केलं साकार; ठरली स्वतः चा स्टुडिओ थाटणारी पहिली मराठी युट्यूबर ) हृता दुर्गुळे नुकतंच दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. तसेच अभिनेत्री पती, सासर, आणि सासुसोबतचे अनेक किस्से शेअर करताना दिसून येते. आपल्या सासरची मंडळी फारच छान, प्रेमळ आणि समजूतदार असल्याचंदेखील हृता सांगते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात