मुंबई, 11 ऑगस्ट: तब्बल 10 वर्ष टेलिव्हिजन गाजवून आता मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन उडू उडू झालं या मालिकेतून हृतानं महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मन जिंकली. इतकंच नाही दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातून हृतानं रंगभूमीवरही काम केलं. तब्बल 10 वर्ष छोट्या पडद्यावर रमलेल्या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावरही तितकीच दाद दिली. यंदाचं वर्ष हृतासाठी खास ठरलं कारण एक मालिका, नाटक लग्न आणि दोन बॅक टू बॅक सिनेमे याच वर्षी प्रदर्शित झाले. हृतानं जून महिन्यात प्रतीक शाहबरोबर लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीनं दिलेल्या या गुड न्यूजनंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला मात्र तितकंच तिला ट्रोल देखील केलं. हृतानं गुजराती नवरा केला असं म्हणत तिच्यावर प्रचंड ट्रोलिंग करण्यात आलं. पण हृतानं खरंच गुजराती नवरा केला आहे का? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. अभिनेत्रीनं याचा खुलासा केला आहे. हृतानं प्रतीक शाहबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितल्यानंतर तिच्या चाहत्यांनी प्रतीक शाहच्या आडनावावरुन तो गुजराती असेल असा अंदाज लावला. एक मराठी अभिनेत्री जिनं इतकी वर्ष मराठीत काम केलं. एका महाराष्ट्रीय कुटुंबातून आलेली मुलगी आता गुजराती मुलाबरोबर लग्न करणार असं अनेकांनी म्हटलं. हृतानं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याचप्रमाणे हृताचा नवरा प्रतीकनं देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. हेही वाचा - Sonalee Kunal Wedding Story: सोनाली कुणालची वेडींग स्टोरी प्रदर्शित; पहिल्याच भागात सांगितली भावाची ‘ती’ आठवण टाइमपास 3 आणि अनन्या असे बॅक टू बॅक हृताचे दोन सिनेमे जुलै महिन्यात प्रदर्शित झाले. एका सिनेमात एका जिद्दी आणि धाडसी मुलीची अनन्याची भूमिका तर दुसऱ्या सिनेमात टपोरी, बबली व्यक्तिरेखा हृतानं साकारली. तिच्या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांनी भरुभरुन प्रेम दिलं.
दरम्यान सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृतानं अनेकांना मुलाखती दिल्या. तेव्हा भूमिकेविषयी तसेच प्रतीक आणि तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले गेले. त्याचप्रमाणे प्रतीक शाह म्हणजे गुजराती मुलगा यावरुन तुला ट्रोल केलं गेलं असा प्रश्न विचारला असता हृता म्हणाली, ‘मी कोणाशीही लग्न करेन. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे. शाह आहे गुजराती मुलगाच का? मराठी मुलाशी का लग्न नाही करणार. माझ्या आई वडिलांना काही प्रॉब्लेम नाहीये मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे’. प्रतीक गुजराती आहे का या प्रश्नावर हृता म्हणाली, ‘प्रतीक हा गुजराती नाही. तो महाराष्ट्रीयन आहे. शाह म्हणजे ते सोलापूरचे शाह जे आधी शिफ्ट झाले होते. आम्ही घरी पूर्णपणे मराठीमध्ये बोलतो. माझ्या सासूबाई मँगलोरिअन आहेत. त्यामुळे आमच्याकडे विविध संस्कृतीचा मेळ आहे’.