Super 30 : हृतिकनं साकारलाय सायकलवरून पापड विकणारा 'हा' शिक्षक

Super 30 : हृतिकनं साकारलाय सायकलवरून पापड विकणारा 'हा' शिक्षक

या सिनेमात बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जून : अभिनेता हृतिक रोशनचा सिनेमा Super 30 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमात बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. या सिनेमात हृतिकने गणित शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ते दरवर्षी गरीब घरातील पण अभ्यासात हुशार अशा ३० मुलांची निवड करतात आणि त्यांना आयआयटीचं ट्रेनिंग देतात. त्यांना शिकवणी देताना ते त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचाही खर्च उचलतात. ते इतके प्रसिद्ध आहेत की अनेक श्रीमंत घरातील मुलंही त्यांच्याकडे शिकवणी मिळावी म्हणून प्रयत्न करतात. पण खऱ्या आयुष्यातील हिरो आनंद कुमार यांना फार कमी लोक ओळखतात.

आनंद कुमार पटनामध्ये ‘सुपर 30’ व्यतिरिक्त रामानुजम क्लासेसही चालवतात. या क्लासमध्ये पैसे घेऊन शिकवलं जातं. पण आनंदच्या सुपर 30 मधील मुलं मात्र रामानुजम क्लासेसमधून मिळालेल्या पैशातून शिकतात. रामनुजममध्ये सध्या 300 ते 400 मुलं शिकतात. या क्लासची दीड वर्षाची फी 27 हजार आहे. ज्या मुलांना फी देणं शक्य नाही त्यांना फ्रीमध्ये शिकवण्यात येतं. मागच्या 15 वर्षांत आनंद कुमार यांनी अशाप्रकारे शिकवलेल्या 450 विद्यार्थ्यांपैकी 396 विद्यार्थ्यांनी IIT क्वालिफाय केलं आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. आपल्या कॉलेज लाइफमध्ये त्यांनी सायकल वरून पापड विकून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

'या' पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट


आनंद यांच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर त्यांनी ऋतू रश्मिशी अंतरजातीय विवाह केला. ऋतू आणि आनंद यांनी 2008मध्ये लग्न केलं. ऋतू यांनी आनंद कुमारची गणित शिकवण्याची पद्धत आवडली. ऋतू या सुद्धा शिक्षिका असून 2003 मध्ये त्यांची निवड बीएचयू आटी मध्ये झाली होती. पण या दोघांच्या लग्नानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये खूप गोंधळ माजला होता. तर दुसऱ्या बाजूला बिहार मधील अनेक कोचिंग क्लासेसनी, मीडियानं आणि बिहारचे माजी डीजीपी अभयानंद यांनी आनंद कुमार आणि त्यांच्या सुपर 30 वर अनेक आरोपही केले. आनंद कुमार रामानुजम क्लासेसमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही सुपर 30मध्ये सामावेश करतात असा आरोप आनंद यांच्यावर केला आहे. आनंद कुमार यांना आतापर्यंत राष्ट्रीय कल्याण पुरस्कारासोबतच अन्य पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे.

Loading...
 

View this post on Instagram
 

And #AnandKumar does it again! 26 of his 30 students cracked IIT-JEE! Congratulations and keep inspiring! #Super30 @hrithikroshan #VikasBahl @reliance.entertainment @fuhsephantom @wardakhannadiadwala @sajidnadiadwala @nadiadwalagrandson


A post shared by Super 30 (@super30film) on

हा सिनमा शूटिंग सुरू झाल्यापासूनच काही ना काही कारणानं वादात अडकला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यवर मीटू मोहिमे अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. आनंद कुमार यांच्यावर सिनेमा बनत असल्याचं समजल्यावर लोकांनी त्यांच्यावर अनेक आरोप लावायला सुरूवात केली होती त्यामुळेही अनेक वाद निर्माण झाले होते. आयआयटीची तयारी करून घेणारं इन्स्टिट्यूट ‘सुपर 30’ आनंद कुमार यांनी एकट्यानं उभं केलेलं नाही. अशाप्रकारचे आरोप आनंद कुमार यांच्यावर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सिनेमाच्या दिग्दर्शकांनी हा सिनेमा आनंद कुमार यांचा बायोपिक नाही असं स्पष्ट केलं आहे.

फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान

‘सुपर 30’मध्ये हृतिकसोबत टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसणार आहे. मृणालनं या आधी काही मराठी सिनेमात आणि ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. सुपर 30 हा मृणालचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. याशिवाय या सिनेमामध्ये पंकज त्रिपाठी, नंदिश सिंह सिंधू, विरेंद्र सक्सेना आणि अमित साध या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...