जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / थिएटरमध्ये पाहता येणार 'रामायण'; 300 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटासाठी कोण साकारणार रामाची भूमिका?

थिएटरमध्ये पाहता येणार 'रामायण'; 300 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटासाठी कोण साकारणार रामाची भूमिका?

थिएटरमध्ये पाहता येणार 'रामायण'; 300 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटासाठी कोण साकारणार रामाची भूमिका?

चित्रपट निर्माते मधु मेंटाना (Film Producer Madhu Mantena) यांनी ‘रामायण’ (Ramayana) या चित्रपटाची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जानेवारी: भारतामध्ये रामायणावर (Ramayana) आतापर्यंत अनेक टीव्ही मालिका (Tv Serials) आणि चित्रपट (Films) चित्रित करण्यात आले आहेत. तुम्हाला आठवत असेलचं 90 च्या दशकात जेव्हा टीव्हीवर ‘रामायण’ ही मालिका लागायची, तेव्हा गावातील रस्ते ओस पडायचे. सगळ्या गल्ल्या आणि चाळी एकत्र येवून ही मालिका पाहण्याचा आनंद घ्यायची. यावरून ही मालिका किती लोकप्रिय होती, याचा अंदाज लावला जावू शकतो. छोट्या पडद्यावर ‘रामायण’ मालिकेनं मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आता या विषयावर बॉलिवूडचा बिग बजेट (Bollywood big budget movie Ramayana) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट निर्माते मधु मेंटाना (Film Producer Madhu Mantena) या चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठीच्या कलाकारांची निवड देखील फायनल झाली आहे. या चित्रपटात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika padukone) आणि अॅक्शन हिरो ऋतिक रोशन (Hrithik Roshan) दिसणार आहेत. या चित्रपटाचं बजेट तब्बल 300 करोड रुपये (Budget 300 crore rs) असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा चित्रपट कसा असेल, याची कल्पना केली जावू शकते. या चित्रपटात दीपिका पादुकोण सीतेच्या भूमिकेत तर ऋतिक रोशन रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हे ही वाचा- KGF Chapter 2 Release Date – कधी प्रदर्शित होणार KGF2 ? मधु मेंटाना निर्मित ‘रामायण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीश तिवारी हे करणार आहेत. नितीश तिवारी यांनी यापूर्वी अमिर खानच्या ‘दंगल’ आणि सुशांत सिंह राजपुत आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘छिछोरे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मधु मेंटाना यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 3D स्वरुपात शुट केला जाणार आहे. तसेच या चित्रपटाचं कामही सुरू करण्यात आलं आहे. खरंतर, रामायण हा विषय अनेक लोकांच्या भावनेशी जोडलेला आहे. त्यामुळे या चित्रपटात झालेली एक चूकही खूप महागात पडू शकते. त्यासाठी चित्रपट निर्मित्यांनी काही तज्ज्ञ लोकांची समिती स्थापन केली आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने संशोधनाची जबाबदारी या समितीकडे असणार आहे. रामायण हा खूप मोठा धार्मिक ग्रंथ आहे, त्यामुळे तीन तासांच्या चित्रपटात हा विषय हाताळणं आव्हानात्मक आहे. त्यामुळे हा चित्रपट दोन भागांत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे, अशी माहिती मधु मेंटाना यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात