मुंबई, 12ऑक्टोबर: नवरात्रीनिमित्त (Navratri 2021) मराठमोळी अभिनेत्री अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) खास गरबा स्पेशल घागरा चोली लुक केला आहे. तिने या लुकमधील काही फोटो व व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा परमसुंदरी लुक चाहत्यांना देखील भलताच आवडलेला दिसत आहे.
सोनाली कुलकर्णी या घागरा चोलीमध्ये खुपच बोल्ड दिसत आहे. सोनालीचा हा ट्रेडीशनल लुक पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. यासोबतच सोनालीने परमसुंदरी या गाण्यावर एक जबरदस्त रील व्हिडिओ शेअर केला आहे. याला देखील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
शारदीय नवरात्रौत्सवाचे औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री विविध फोटोशूट करत आहे काही जण विविध कला सादर करताना दिसत आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदारने जोगवा सादर केला तर अभिनेत्री अमृता खानविलकरने गरबा साद केला होता. यासोबत शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रुपातील फोटो शेअर करत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 7 मे रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.यानंतर सोनाली पती कुणालसोबत मालदिवला गेली होती. यावेळी तिने पतीसोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. या फोटोत सोनालीने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली होती. तिच्या या लूकची सोबत तिच्या मंगळसूत्राची देखील त्यावेळी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
View this post on Instagram
सध्य सगळीकचे इन्स्टा रीलचे वारे जोरात वाहत आहे. जो तो उठतोय आणि इन्स्टावर रील करत असतो. काही दिवसापूर्वी सोनालीने असेच एक इन्स्टा रील केले होते ज्यामुळे ती चर्चेत आली होती. या रीलमध्ये सोनाली विविध एक्सप्रेशन्स देताना दिसलीहोती. यामध्ये सोनाली वेगवेगळ्या इमोजीप्रमाणे एक्सप्रेशन्स दिल्या होत्या. कधी सॅड तरी कधी आनंदी अशी एका क्षणात सोनाली चेहऱ्याचे हावभाव बदलताना दिसत होती. यामध्ये तिने एक्सप्रेशन्स क्वीन म्हणजी आपली सर्वांची लाडकी नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदाना हिला देखील मागे टाकले असल्याची चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर रंगली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Navratri, Sonali kulkarni