Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दुधी भोपळ्याचा रस ठरला घातक; ICU मध्ये पोहोचली अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी

दुधी भोपळ्याचा रस ठरला घातक; ICU मध्ये पोहोचली अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी

 अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं.

अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं.

अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 ऑक्टोबर- अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. ताहिराला दुधी भोपळ्यामुळे फूड पॉयझींनिंग झालं होतं. ताहिराने नुकताच चाहत्यांमध्ये दुधी भोपळ्याबद्दल जागृती करण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ताहिराची प्रकृती सध्या स्थिर आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्यासोबत नेमकं काय आलं याचा खुलासा केला आहे. ताहिराने व्हिडीओ शेअरकरत सांगितलं, 'एकदम कडवट चव असूनदेखील तिने दुधी भोपळा, आवळा आणि हळदीच्या मिश्रणापासून तयार झालेलं ज्युस पिलं होतं. त्याचा दुष्परिणाम तिच्या शरीरावर झाला या मिश्रणामुळे तिला तब्बल १७ वेळा उलटी झाली. इतकंच नव्हे तर तिचा ब्लड प्रेशर ४० वर आला होता. त्यामुळे तिला तात्काळ ICU मध्ये दाखल करावं लागलं होतं. त्यांनतर वेळीच मिळालेल्या उपचाराने तिची प्रकृती आता उत्तम आहे. मात्र व्हिडीओमध्ये ताहिराने म्हटलं आहे, कृपा करून यावर लक्ष द्या शरीरासाठी हेल्थी म्हणून कोणत्याही चुकीच्या मिश्रणाचा ज्यूस अजिबात पिऊ नका'.

(हे वाचा:ओळखलं का या फोटोतील मुलाला? आज आहे बॉलिवूडचा रोमँटिक हिरो!)

कारण हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. दुधी भोपळ्यासोबत केलेलं हे मिश्रण तर अत्यन्त धोकादायक आहे. यामुळे मी थेट ICU मध्ये पोहोचले होते. सध्या मी शांत आणि ठीक दिसत असले. तरी मला या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. त्यामुळे मी ही जागृती करत आहे. मला जागृती करण्यासाठी इन्स्टाग्राम पेक्षा दुसरं कोणतं चांगलं व्यासपीठ असू शकतं. मला माझ्या डॉक्टरांनीसुद्धा याबाबतीत जागृती करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मी फोनद्वारे सर्वांनाच ही माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या'. असं म्हणत ताहिराने व्हिडीओ शेअर केला आहे. ताहिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत विविध गोष्टींमध्ये चाहत्यां अवेअर करत असते. तसेच ती आपल्या खाजगी आयुष्याच्याही अपडेट्स चाहत्यांना देत असते.

(हे वाचा:पद्मिनी कोल्हापुरेने माजवली होती खळबळ;40वर्षानंतरही आठवला जातो तो विवादित प्रसंग)

ताहिरा ही अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी तर आहेच शिवाय ती एक प्रसिद्ध लेखिका आणि डायरेक्टरसुद्धा आहे. ती सतत विविध शोजमध्ये आयुष्मानसोबत सहभागी होत असते. तिची प्रकृती आता ठीक आहे. तसेच ती आपला आगामी चित्रपट 'शर्माजी की बेटी'च्या सेटवर परत आली आहे. तर दुसरीकडे पती आयुष्मानसुद्धा अनेक चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. तो लवकरच ऍक्शन हिरो, डॉक्टर जी’, ‘चंडीगढ़ करे आशिकी’ आणि ‘अनेक’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment