Birthday Special : 22 वर्षांचा संसार मोडून अभिनेत्यानं केलं गर्लफ्रेंडशी लग्न, पत्नीनं दिली ही प्रतिक्रिया

Birthday Special : 22 वर्षांचा संसार मोडून अभिनेत्यानं केलं गर्लफ्रेंडशी लग्न, पत्नीनं दिली ही प्रतिक्रिया

22 वर्षांचा संसार मोडून गर्लफ्रेंडशी दुसरं लग्न केल्यानंतर या अभिनेत्याचं खासगी जीवन सर्वाधिक चर्चेत आलं.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता ज्याच्या गाण्यासाठी अख्खं बॉलिवूड दिवानं होतं. अनेकदा त्याच्या आवाज आणि गाण्याच्या स्टाइलमुळे त्याची चेष्टा केली गेली मात्र हा सुपरस्टार थांबला नाही. हा गायक म्हणजे हिमेश रेशमिया. आज हिमेश त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिमेशची सक्सेस स्टोरी जेवढी लोकप्रिय ठरली तितकंच त्याचं खासगी जीवनही. हिमेशचं खासगी जीवन त्यावेळी जास्त चर्चेत आलं जेव्हा त्यानं 22 वर्षांचा संसार मोडून गर्लफ्रेंडशी दुसरं लग्न केलं.

VIDEO : प्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटूच्या लग्नात बॉलिवूडच्या 'या' गाण्यानं धम्माल

हिमेशनं 1995 मध्ये कोमल रेशमियाशी लग्न केलं होतं. त्यांचं हे लग्न जवळपास 2 दशकं टिकलं. त्यानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेऊन ते दोघं वेगळे झाले. त्यांचं हे लग्न तुटण्याचं कारण हिमेशची गर्लफ्रेंड सोनिया असल्याचं बोललं जात होतं मात्र हिमेशच्या पत्नीची यावर प्रतिक्रिया आल्यानंतर मात्र सर्वच अवाक् झाले. कोमल म्हणाली, 'हिमेश आणि माझ्यामध्ये कपॅटिबिलिटीची समस्या आहे. आम्ही वेगळे झालो असलो तरी एकमेकांच्या कुटुंबांच्या खूप जवळ आहोत आणि प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात आम्ही नेहमीच एकत्र असू.'

सुश्मिता सेनला KISS करताना दिसला बॉयफ्रेंड रोहमन, Photo Viral

कोमल रेशमिया पुढे म्हणाली, ‘आमचा घटस्फोट आमच्याच पर्सनल कारणांमुळे झाला. सोनिया याला अजिबात कारणीभूत नाही. तर मी आणि माझा मुलगा स्वयं दोघांनाही सोनिया आवडते.’  कोमलच्या या प्रतिक्रियेनंतर घटस्फोटानंतरही हिमेशचे त्याच्या एक्स वाइफशी खूप चांगले संबंध आहेत हे दिसून आलं. यानंतर हिमेशनं 11 मे 2018 ला टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरशी लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून हिमेशला एक 13 वर्षांचा मुलगा आहे.

सुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग

हिमेशची म्यूझिक इंडस्ट्रीमधील एंट्री सुद्धा फिल्मी होती. वयाच्या 11 व्या वर्षी मोठ्या भावाला गमावल्यानंतर वडीलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिमेशनं गायक होण्याचा निर्णय घेतला. पण गायक होण्याआधी त्यानं वयाच्या 16 व्या वर्षी  प्रोड्यूसर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानं ‘अंदाज’ आणि ‘अमर प्रेम’ या मालिका केल्या. आज हिमेश फक्त एक गायकच नाही तर अभिनेता आणि निर्माता सुद्धा आहे. या शिवाय तो टीव्ही शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

=====================================================================

दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

First published: July 23, 2019, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading