मुंबई, 25 सप्टेंबर : सलमान खान Salman khan सगळ्यांत महागडा कलाकार आहे याविषयी नेहमीच चर्चा आहे. सलमानचं बिग बॉसचं Bigg Boss मानधन कोट्यवधी रुपये असल्याचंही बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात सलमान एका एपिसोडसाठी किती पैसे घेतो तो आकडा ऐकून थक्क व्हाल. मनोरंजनाला वाहिलेल्या एका वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार सलमानने बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये प्रत्येक दिवसाचे 11 कोटी रुपये घेतले होते आणि आता त्यानं मानधन वाढवलं आहे. Bigg Boss चा 13 वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. 15 आठवडे हा शो चालेल. सलमान खान पुन्हा एकदा यात होस्ट म्हणून दिसेल. 2018 मध्ये संपूर्ण सीझनचे मिळून सलमानला 165 कोटी मिळाले होते. आता 2019 मध्ये बिग बॉसचा सीझन 13 आणखी मोठ्या प्रमाणावार लाँच करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची जाहिरात पाहता चॅनेल आणि निर्मात्यांनी यावर आणखी खर्च केल्याचं दिसतं. सलमाननेही अर्थातच आपली फी वाढवी आहे, असं पिंक व्हिला नावाच्या वेबसाइटचा रिपोर्ट सांगतो. पाहा - VIDEO: झमाझम नाच राजे…योगी आदित्यनाथ यांच्या मंत्र्यांचा TikTokव्हिडिओ व्हायरल त्यांच्या रिपोर्टनुसार प्रत्येक एपिसोडसाठी सलमानला या वेळी 13 कोटी रुपये दिले जाणार आहेत. बिग बॉस 13 105 दिवस म्हणजे 15 आठवडे चालणार आहे. त्यामुळे आता तसा हिशोब केला तर या वेळी बिग बॉस सलमान खानला 200 कोटींच्या आसपास मानधन देणार. वाचा - पैशासाठी आईनेच करु दिला होता बलात्कार, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा बिग बॉस या गाजलेल्या टीव्ही रिअॅलिटी शोचा होस्ट सलमान खान आहे. गेली दहा वर्षं तो हा शो करतो आहे. एका मुलाखतीत सलमान खानने आपल्याला बिग बॉस होस्ट करण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं. पण अजूनही तो नव्या सीझनमध्ये होस्ट म्हणून दिसतो आहे आणि या कामासाठी तो गलेलठ्ठ मानधनही घेत असल्याची चर्चा आहे. त्याचं मानधन 400 कोटी असल्याची अफवाही पसरली होती. पण पिंकव्हिलाने दिलेल्या बातमीत मात्र हा आकडा 200 कोटी दिसतो. एकूण बिग बॉस आणि सलमानची कोटीच्या कोटी उड्डाणं थक्क करणारी आहेत. —————————————————————– पुण्यात पावसाचा कहर; कोंढवा येवलेवाडी परिसरात पाणीच पाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.