बॉलिवूड सुपरस्टारनं शेअर केला थ्रोबॅक फोटो, ओळखा पाहू कोण आहे 'हा' अभिनेता

या बॉलिवूडच्या लाडक्या सुपरस्टारचा एक थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 01:39 PM IST

बॉलिवूड सुपरस्टारनं शेअर केला थ्रोबॅक फोटो, ओळखा पाहू कोण आहे 'हा' अभिनेता

मुंबई, 25 सप्टेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये 'थ्रोबॅक पिक्चर' असा ट्रेंड सुरू आहे. अनेक बॉलिवूड कलाकर #ThrowBackPicture असा हॅशटॅग वापरत त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी, विकी कौशल यांनी त्याच्या बालपणीचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता या यादीत अभिनेता रणवीर सिंहची भर पडली आहे. रणवीरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच त्याच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला. ज्यात तो कृत्रिम दात लावून राक्षसाप्रमाणं हावभाव करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रणवीरनं त्याला डोक्यावर शिंग असेलेला एक इमोजी कॅप्शनमध्ये दिला आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यावर पद्मावत मधील खिल्जीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तसेच अभिनय हा लहानपणापासूनच अंगात भिनलेला आहे हेही लक्षात येत.

दिवसातून 6 वेळा खाणं खाऊनही अशी फिट राहते दीपिका पदुकोण

Loading...

 

View this post on Instagram

 

😈

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरच्या या फोटोवर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांची हा फोटो रणवीरच्या आतापर्यंतच्या सर्व फोटोंमध्ये क्यूट असल्याचं म्हटलं आहे. रणवीरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच कबीर खान दिग्दर्शित '83' या सिनेमातून प्रेक्षाकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो माजी क्रिकेटर  आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

पैशासाठी आईनेच करु दिला होता बलात्कार, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

'83' हा सिनेमा भारतीय क्रिकेट संघानं 1983 मध्ये विश्वचषक जिंकत केलेल्या ऐतिहासिक कामगिरीवर आधारित आहे. या सिनेमात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे तर अभिनेता साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच मराठी अभिनेता चिराग पाटील, मान सिंग, पंकज त्रिपाठी, ताहिर भसीन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 2020 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, फेसबुक पोस्ट झाली VIRAL

=====================================================

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...