मुंबई, 09 जुलै : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात हेमा मालिनी यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एकेकाळी त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केलं. वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यांनी आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केलं. हेमा यांनी पडद्यापासून राजकारणापर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि बॉलिवूडबद्दल वेळोवेळी मोकळेपणाने बोलताना दिसते. आता हेमा यांनी नुकतंच मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. हेमा मालिनी या कास्टिंग काउचच्या बळी ठरल्या आहेत. त्याबद्दलच त्यांनी मोठा खुलासा केला आहे. हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत एका चित्रपट निर्मात्यानं त्यांना साडीच्या पदराची पिन काढायला लावली होती. याविषयी सांगताना हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांना कुठला तरी सीन शूट करायचा होता. मी नेहमी माझ्या साडीला पिन लावायचे. तो सिन शूट करताना मी म्हणाले, या सीनमध्ये माझा पदर खाली पडेल, मी पिन लावते. पण ते म्हणाले, आम्हाला तेच हवं आहे, पिन काढू नको.’ असं सांगितलं. हेमा मालिनी यांनी केलेल्या या खुलास्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
हेमा यांनी आजचे चित्रपट निर्माते त्यांच्या स्टार्सला चांगलं दिसण्यासाठी त्रास देत नाहीत, पण त्यांच्यावेळी कशी परिस्थिती होती याबद्दल देखील मत व्यक्त केलं आहे. हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘आजकाल शूटिंग करणे खूप आव्हानात्मक आहे, मला पुन्हा काम करायला आवडेल असं वाटत नाही.’ असं त्या म्हणाल्या. Karan Johar: ‘तू गे आहेस का?’ चाहत्याने विचारलेल्या त्या प्रश्नावर करण जोहरच थेट उत्तर; म्हणाला ‘तूला पण..’ ‘सत्यम शिवम सुंदरम’बद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, राज कपूर आले आणि त्यांना या चित्रपटाबद्दल सांगितले. हेमा म्हणाल्या, ‘तो म्हणाला हा एक चित्रपट आहे जो तू करणार नाहीस, पण तू कर अशी माझी इच्छा आहे.’ हेमा मालिनी म्हणाल्या की, यावेळी तिची आईही तिच्या शेजारी बसली होती आणि तिने नाराजीने मान हलवली. अलीकडेच, धर्मेंद्र यांनी हेमा आणि तिच्या दोन मुलींना आपला नातू करण देओलच्या लग्नासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित न करण्यासाठी माफी मागणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यावर ते चर्चेत आले. करण हा सनी देओलचा मुलगा आहे. त्याने अलीकडेच द्रिशा आचार्यसोबत लग्न केले, पण हेमा आणि त्यांच्या दोन मुली या सोहळ्याला हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे हेमा आणि धर्मेंद्रच्या पहिल्या कुटुंबाच्या नात्याची खूप चर्चा झाली.