मुंबई, 07 मार्च : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री इशा देओल मागच्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली. पहिली मुलगी राध्यानंतर 2 ऑक्टोबर 2019 ला मिरायाचा जन्म झाला. आपल्या दोन्ही मुलींच्या जन्मानंतर इशा बॉलिवूडपासून दूर आहे. सध्या ती तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. पण दुसऱ्यांदा आई झाल्यावर इशा अशा एक गंभीर आजाराची शिकार झाली होती. ज्याबद्दल हेमा मालिनी यांनी नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला. इशाच्या या फेज बद्दल सांगताना त्या खूपच भावुक झाल्या होत्या. हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दुसऱ्या बाळंतपणानंतर इशाला झालेल्या आजाराबद्दल सांगितलं. मिरायाच्या जन्मानंतर इशा देओल पोस्टपार्टम डिप्रेशनची शिकार झाली होती. हेमा मालिनी सांगतात, बाळंतपणानंतर एका स्त्री फक्त शारिरिकच नाही तप मानसिक आणि भावनिक बदलांना सामोरी जात असते. काही स्रिया डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनचा बळी ठरतात. पण अनेकदा त्यांना याबाबत माहिती सुद्धा नसते. आता फ्रीमध्ये पाहू शकता ‘तान्हाजी’, कसं? इथे वाचा
इशा देओलला सुद्धा या डिप्रेशनचा बळी ठरली होती. पण आई हेमा मालिनीच्या सतर्कतेमुळे ती यातून सुखरुप बाहेर पडली आहे. याबद्दल बोलताना इशा म्हणाली, हे प्रेग्नन्सीच्या वेळी झालेल्या हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे प्रत्येक स्रीसोबत होतं ज्याला पोस्ट पार्टम डिप्रेशन असं म्हणतात. हा खरं तर खूप गंभीर आजार आहे. जर याबद्दल वेळीच तुम्हाला समजलं नाही तर त्यामुळे तुम्हाला जीवही गमवावा लागू शकतो. Birthday Special : अनुपम खेर करणार होते अर्चना पुरणसिंहला KISS, पण… पोस्ट पार्टम डिप्रेशनमुळे स्रीयांमध्ये मूड स्विंग्स, एकटेपणा, चिडचिड होणे, रडावंसं वाटणं किंवा मी या बाळाला सांभाळू शकेन की नाही अशी काळजी वाटणे यासारखी या आजाराची लक्षणं दिसू लागतात. इशा सांगते जेव्हा माझ्यासोबत हे सर्व होत होतं त्यावेळी माझ्या आईच्या हे लक्षात आलं. तिनं मला ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. ज्यानंतर मी एक महिन्यात ठिक झाले.
इशा देओलनं 2012 मध्ये बिझनेसमन भरत तख्तानी याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2017 मध्ये राध्याचा जन्म झाला. तर 2019 मध्ये इशानं मिरायाला जन्म दिला. सध्या इशा सिनेमांपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं अम्मा मिया हे तिचं पुस्तक प्रकाशित केलं. 2002 मध्ये कोई मेरे दिल से पूछे या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या इशाला सिनेमांपेक्षा पुस्तकांमध्ये जास्त रुची आहे. सनी लिओनी कठीण वर्कआउट करते तेव्हा… पाहा हा VIDEO

)







