Birthday Special : अनुपम खेर करणार होते अर्चना पुरणसिंहला KISS, पण...

अनुपम खेर बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा 65 वा वाढदिवस.

  • Share this:

मुंबई,07 मार्च : अनुपम खेर बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा 65 वा वाढदिवस. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी अनुपम यांनी बॉलिवूड अक्षरशः गाजवलं. पण त्याच्या एका सिनेमाच्या सेटवर असं काही घडलं की ज्याचा किस्सा  फार कमी लोकांना माहित आहे. हा किस्सा आहे 'लड़ाई' सिनेमाच्या सेटवरचा. ज्यात अनुपम खेर आणि अर्चना पुरणसिंह यांच्यातील एक किसिंग सीन शूट होणार होता.

शाहरुख खान आणि काजोल यांचा सुपरहिट सिनेमा 'कुछ-कुछ होता है' मध्ये मिस्टर मल्होत्रा आणि मिस ब्रिगेंजा यांच्यातील केमिस्ट्रीनं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या दोन्ही भूमिका अभिनेता अनुपम खेर आणि अर्चना पुरणसिंह यांनी साकारल्या होत्या. या सिनेमाशिवाय अनुपम आणि अर्चना यांनी 1989 मध्ये 'लड़ाई' या सिनेमातही एकत्र काम केलं होतं. ज्यात या दोघांमध्ये एक किसिंग सीन शूट करण्यात येणार होता. या सीनशी संबंधित एक किस्सा काही दिवसांपूर्वीच अर्चना यांनी कपिल शर्मा शोमध्ये शेअर केला होता.

हटवण्यात आला पूर्ण सिक्वेन्स

अर्चनानं सांगितलं, मी आणि अनुपम 'लड़ाई' सिनेमाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी, दिग्दर्शकानं आमच्यामध्ये एक किसिंग सीन शूट करण्याचं ठरवलं. मला जेव्हा याबद्दल समजलं त्यावेळी मी खूप घाबरले होते. याआधी मी ऑनस्क्रीन एकही किसिंग सीन केला नव्हता. त्यामुळे मी दीपकला फोन केला आणि हा सीन मी करु शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. मात्र त्यानंतर असं झालं की या सिनेमातून हा संपूर्ण सिक्वेन्स हटवण्यात आला. पण असं का केलं गेलं ते मात्र मला अद्याप समजलेलं नाही.

किरण खेर यांना घाबरले होते अनपम खेर?

या शो दरम्यान अर्चना पुरणसिंहनं अनुपम यांना विचारलं की, किरणशी लग्न केल्यानंतर तुम्हाला मला किस करण्याची भीती वाटली होती का? यावर अनुपम म्हणाले, मला या सीनची अजिबात भीती वाटली नव्हती. मात्र मला हा सीन करणं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. त्यामुळे मी दीपकला विनंती केली की हा सीन या सिनेमातून काढून टाकावा. हा फक्त एका सिनेमातील किस्सा होता. मात्र अर्चना आणि अनुपम यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आणि या दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये हिट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2020 07:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading