मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sapna Chaudhary : सरेंडर झाल्यानंतर सपना चौधरीची कोठडीतून सुटका; 'या' अटीवर जामीन मंजूर

Sapna Chaudhary : सरेंडर झाल्यानंतर सपना चौधरीची कोठडीतून सुटका; 'या' अटीवर जामीन मंजूर

डान्सर सपना चौधरीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. काय होतं प्रकरण जाणून घ्या.

डान्सर सपना चौधरीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. काय होतं प्रकरण जाणून घ्या.

डान्सर सपना चौधरीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. काय होतं प्रकरण जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 19 सप्टेंबर : हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण यावेळी एकाच वेगळ्या कारणामुळे सपना चौधरी चर्चेत आली आहे. सपनाला फसवणूकीच्या आरोपाखाली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सपनाने सोमवारी कोर्टात सरेंडर केलं. त्यानंतर  एसीजेएम कोर्टाकडून सपना चौधरीला ताब्यात घेण्यात आलं होतं. अटक केल्यानंतर सपनाच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्ज कोर्टात सादर केल्यानंतर आता सपनाला कोर्टाकडून दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे.   या प्रकरणी 30 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

डान्सर सपना चौधरीविरोधात विश्वास हनन यांनी फसवणूकीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.  हे प्रकरण 2018मधील असून जुन्या प्रकरणी सपनाला अटक करण्यात आली.  13 ऑक्टोबर 2018मध्ये सपना चौधरीनं लखनऊच्या आशियाना येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मंजूर केलं होतं. त्यासाठी तिनं अँडवान्स पैसे घेतले होते.  कार्यक्रमला येण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकिटं देखील बुक करण्यास सांगितलं.  प्रत्यक्षात मात्रा कार्यक्रमादिवशी सपना कार्यक्रमाला हजर राहिली नाही त्याचप्रमाणे प्रवासाची तिकिटं देखील तिनं परत केली नाही.

हेही वाचा - Suhana Khan: शाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर

सपना कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यानं आयोजकांचं मोठं नुकसान झालं.  फिरोज खान नावाच्या एका व्यक्तीनं सपना सह आणखी सगा जणांविरोधात 14 ऑक्टोबर 2018मध्ये आशियाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सपना चौधरी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जवळपास 4 वर्षांनी या प्रकरणी पोलिसांनी सपना चौधरीवर कारवाई करत तिला अटक केली. अटक केल्यानंतर तिनं गुन्हाची कबूली दिली.  सपनाला आता जामीन मंजूर झाला असला तरी तिला दर महिन्याच्या कोर्टाच्या तारखेला कोर्टासमोर हजर राहणार आहे. या एका अटीवर सपनाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Dancer