मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Suhana Khan: शाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर

Suhana Khan: शाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर

 बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. परंतु बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वीच सुहाना खान प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई,17  सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. परंतु बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वीच सुहाना खान प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. आपल्या फॅशन सेन्स आणि व्हेकेशनमुळे सुहाना सतत चर्चेत असते. नुकतंच सुहाना दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून आली. दरम्यान दुबईत आपल्याच डुप्लिकेटसोबत सुहानाची भेट घडून आली. या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच सुहाना खान आपली आई गौरी खानसोबत एयरपोर्टवर दिसून आली होती. यावेळी ती व्हेकेशनसाठी दुबईला निघाली होती. एयरपोर्टवर सुहानाला पाहताच चाहत्यांनी फोटोसाठी गर्दी केली होती. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या सुहाना आपली आई गौरी खान, मैत्रीण आणि अभिनेत्री शनाया कपूर आणि तिची आई महिप कपूर यांच्यासोबत दुबईत आपलं वव्हेकेशन एन्जॉय करत आहे. या चौघींचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर समोर येत आहेत. सुहाना खानच्या दुबई व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यामध्ये एक फोटो फारच खास आहे. या फोटोमध्ये सुहाना हुबेहूब आपल्या सारख्याच दिसणाऱ्या एका तरुणीसोबत दिसून येत आहे. या तरुणीचं नाव बरीहा असं आहे. तिला शाहरुख खानची लेक सुहानाची डुप्लिकेट म्हटलं जातं. नुकतंच दुबईत बरीहाची सुहानासोबत भेट घडून आली. स्वतंग बरीहाने सुहानासोबतचा फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. (हे वाचा:'मी कधीच बिकिनी...' अर्जुन कपूरच्या बहिणीने बॉडी फॅट,स्ट्रेच मार्कबाबत लिहलेली पोस्ट चर्चेत ) सुहाना खानच्या या फोटोवर आता मोठ्या प्रमाणात चाहते कमेंट्स करत आहेत. काहींना ती हुबेहूब सुहानासारखी दिसत आहे. तर काहींनी अजिबात साम्य नसल्याचं म्हटलं आहे. सुहाना खानच्या बॉलिवूड डेब्यूबाबत सांगायचं तर ती लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात सुहानासोबत श्रीदेवी यांची धाकटी लेक ख़ुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्या नंदासुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Shahrukh khan, Suhana khan

पुढील बातम्या