जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Harshvardhan Rane: सिंगल मदर असलेल्या अभिनेत्रीला डेट करतोय हर्षवर्धन राणे? म्हणाला 'माझी काही हरकत नाही...'

Harshvardhan Rane: सिंगल मदर असलेल्या अभिनेत्रीला डेट करतोय हर्षवर्धन राणे? म्हणाला 'माझी काही हरकत नाही...'

हर्षवर्धन राणे

हर्षवर्धन राणे

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख आणि बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. याचं कारण म्हणजे दोघांचा एक व्हॅकेशन फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. आता या अफेअरच्या चर्चांवर हर्षवर्धनने मौन सोडलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै :   ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता म्हणजे हर्षवर्धन राणे. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होते. काही दिवसांपूर्वी तो अभिनेत्री किम शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याचं नाव अजून एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख आणि बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. याचं कारण म्हणजे दोघांचा एक व्हॅकेशन फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. आता या अफेअरच्या चर्चांवर हर्षवर्धनने मौन सोडलं आहे. टीव्हीची सुंदर अभिनेत्री संजीदा शेख आणि बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आहेत. आमिर अलीपासून घटस्फोट घेतल्यानंतर संजीदा हर्षवर्धनला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. पण दोघांनी या विषयावर मौन राखणंच पसंत केलं. या दोघांनी ‘तैश’ मध्ये एकत्र काम केलं होतं. पण नुकतेच दोघांचे गीरच्या जंगलातील व्हॅकेशन फोटो समोर आले आहेत. त्यामुळे आता या दोघांच्या नात्याविषयी चाहत्यांच्या मनात पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे. हे दोघे खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का याची सगळ्यांना उत्सुकता असताना आता हर्षवर्धन राणेने ‘न्यूज18’शी बोलताना त्याच्या लव्ह लाईफबद्दल माहिती दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अलीकडेच दोघांनी त्यांच्या संबंधित इंस्टाग्राम अकाऊंटवर जंगल सफारीदरम्यानच्या त्यांच्या खाजगी सुट्टीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये संजीदासोबत तिची मुलगी देखील होती. कारकिर्दीत तब्बल 180 फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता ठरला सुपरस्टार; नाव ऐकून बसणार नाही विश्वास जेव्हा अभिनेत्याला त्याच्या अफेअरबद्दल  विचारण्यात आलं तेव्हा त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. तो म्हणाला, “माझ्याबद्दल काय लिहिलं जातंय याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं ते कामच आहे. मी जसं अभिनय करतो तसं त्यांचं ते लिहिणं काम आहे. म्हणूनच मी या सगळ्याकडे एक माणूस म्हणून पाहतो. मी त्यांचा आदर करतो.  म्हणूनच, मी त्यांचा आदर करतो. ते माझ्याबद्दल काहीही लिहू शकतात. आताही जेव्हा मी त्यांना पाहतो तेव्हा मी त्यांना मिठी मारण्यास मागे पुढे पाहत नाही.’’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

संजीदा शेख बद्दल बोलायचं तर, तिने 2012 मध्ये अभिनेता आमिर अलीसोबत लग्न केलं होतं. दहा वर्षांच्या संसारानंतर दोघे 2022 मध्ये वेगळे झाले. दोघांनाही एक मुलगी आहे. या दोघांच्या घटस्फोटानं चाहत्यांना धक्काच बसला होता. आता घटस्फोटानंतर संजीदा शेख आयुष्यात पुढे गेली आहे. आता आमिर नंतर संजीदाचं नाव हर्षवर्धनसोबत जोडलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात