मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /क्या बात! टेलिव्हिजनच्या सर्वात लोकप्रिय प्रभू श्रीरामांसोबत झळकणार सुबोध भावे; पोस्ट करत म्हणाला...

क्या बात! टेलिव्हिजनच्या सर्वात लोकप्रिय प्रभू श्रीरामांसोबत झळकणार सुबोध भावे; पोस्ट करत म्हणाला...

सुबोध भावे

सुबोध भावे

अभिनेता सुबोध भावे कमालीचा व्यग्र आहे. आता त्याने एका खास आणि सर्वपरीचीत व्यक्तीची भेट घेत त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे उघड केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 नोव्हेंबर : सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. सतत काहीतरी नवीन भूमिका करण्यावर त्याचा भर असतो. प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देतात. त्याने मराठीमध्ये चरित्रपट साकारण्याची परंपरा रुजवली. बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर  यांच्या भूमिका लीलया पेलल्या. अलीकडेच तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सुद्धा झळकला. अभिनेता सुबोध भावे कमालीचा व्यग्र आहे. टीव्ही शो आणि अनेक सिनेमाची शूटिंग्ज, अभिनय, दिग्दर्शन सगळ्या पातळ्यांवर सध्या तो कार्यरत आहे. आता त्याने एका खास आणि सर्वपरीचीत व्यक्तीची भेट घेत त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे उघड केले आहे.

आजपर्यंत अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक मालिका छोट्या पडद्यावर येऊन गेल्या. पण त्यातील एका मालिकेने आणि पात्रांनी मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम घर केलं. ही मालिका म्हणजे रामानंद सागर यांचं 'रामायण'. या रामायणात जेष्ठ अभिनेते अरुण गोविल यांनी साकारलेली रामाची भूमिका अजरामर ठरली आहे. आजही प्रेक्षक या अभिनेत्यांना देवाच्याच रूपात पाहतात. आता अभिनेता सुबोध भावे याने छोट्या पडद्यावरील  सर्वात लोकप्रिय रॅम साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा - Kushal Badrike: 'आयुष्य सुगंधी करुन टाकणारं परफ्युम...'; 'त्या' स्पेशल व्यक्तीसाठी कुशलची स्पेशल POST

सुबोध भावे याने नुकतीच एका इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने तो लवकरच अरुण गोविल यांच्यासोबत झळकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये सरून गोविल यांच्यासोबतच फोटो पोस्ट करत सुबोधने लिहिलंय कि, ''विक्रम - वेताळ आणि रामायण...लहानपणी पाहिलेल्या आणि कायमस्वरुपी लक्षात राहिलेल्या या दोन मालिका. त्यातील प्रमुख भूमिका साकारणारे " अरुण गोविल" सर. त्यांचा चाहता होतोच. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. मनपूर्वक धन्यवाद @siyaramkijai सर. तुम्ही सांभाळून घेतलं. तुम्हाला आणि तुम्ही साकारलेल्या प्रभू श्री राम यांना माझा नमस्कार.''

ही  पोस्ट पाहून सुबोधने चाहते भलतेच खुश झालेले दिसतायत. त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे. आता सुबोधने अरुण गोविल  यांच्यासोबत कुठे झळकणार हे मात्र गुपित ठेवलं आहे. पण येणाऱ्या काळात त्याला या  जेष्ठ कलाकारासोबत बघायला चाहते मात्र आतुर झाले आहेत.

सुबोध भावेंच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळात  'मारवा' या एका नवीन चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध करत आहे. त्याचबरोबर सुबोध भावेची निर्मिती संस्था लवकरच 'कालसूत्र - प्रथम द्वार | मृत्यूदाता' ही  नवीन वेब सिरीज घेऊन येणार आहे. सुबोध भावेंना डिजिटल प्लॅटफॉर्मवर बघण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि सुबोध भावे ही जोडी एकत्र पाहण्यासाठीही प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे. ही मराठी वेब प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Subodh bhave