जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Happy birthday Zareena Wahab : सावळ्या रंगामुळे नव्हतं मिळत काम; वाचा अभिनेत्रीचं न ऐकलेलं सत्य

Happy birthday Zareena Wahab : सावळ्या रंगामुळे नव्हतं मिळत काम; वाचा अभिनेत्रीचं न ऐकलेलं सत्य

Happy birthday Zareena Wahab : सावळ्या रंगामुळे नव्हतं मिळत काम; वाचा अभिनेत्रीचं न ऐकलेलं सत्य

आईपासून ते सासूपर्यंत सगळ्या भूमिका झरीना यांनी निभावल्या. 70 ते 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये झरीना वहाब यांचा होतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 17 जुलै : 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झरीन वहाब (Zareena Wahab) आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतही त्यांनी मोठं नाव कमावलं होतं. आईपासून ते सासूपर्यंत सगळ्या भूमिका झरीना यांनी निभावल्या. 70 ते 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये झरीना वहाब यांचा होतो. झरीना वहाब यांचा जन्म 7 जुलै 1959 ला विशाखापट्टनम येथे झाला होता. झरीना यांनी फिल्म अँड टेलिव्हिझन इन्स्टीट्युट ऑफ इंडीया (FTII), पुणे येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी हिंदी, इंग्रजी, तेलुगू, उर्दू भाषेतील चित्रपटांतही त्यांनी काम केलं होतं. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही झरीना यांना इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

‘देवमाणूस’च्या मायरा सोबत धनश्रीचा कडगावकरचा पारंपरिक अंदाज; लुकवर चाहते घायाळ

आपल्या सावळया रंगामुळे काम मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ज्यावेळी त्या काम मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळी त्यांना काळ्या - सावळ्या रंगामुळे डावलण्यात येत होतं. आणि त्यामुळे काम मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. ‘इश्क इश्क इश्क’ (Ishk Ishk Ishk) हा झरीना यांचा पहिला चित्रपट होता. जेव्हा झरीना यांना समजलं की, देव आनंद त्यांच्या नव्या चित्रपटासाठी फ्रेश चेहरा शोधत आहेत, तेव्हा झरीना यांनी ऑडीशन देण्याचं ठरवलं. या चित्रपटात झरीना यांना झीनत अमान (Zeenat Aman) यांच्या बहिणीचं पात्र मिळालं. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर विशेष कमाल करू शकला नव्हता. पण यांनतर झरीना यांना मोठी ओळख मिळाली. यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.

HBD: डेअरी चालवणाऱ्या बापाचा लेक झाला अभिनेता; रवी किशनने असा केला होता संघर्ष

झरीना यांना राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट चितचोर मधून मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर त्या ‘घरौंदा’, ‘अनपढ़’, ‘सावन को आने दो’, ‘नैया’, ‘सितारा’, ‘तड़प’ अशा चित्रपटात झळकल्या. झरीना यांनी अभिनेता आदित्य पांचोलीसोबत (Aditya Pancholi) विवाह केला होता. त्यांना अभिनेता सूरज पांचोली हा मुलगा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात