छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय अभिनेत्री धनश्री कडगावकर आणि बालकलाकार मिमीचार्वी खडसे यांचा पारंपरिक लुक चाहत्यांना फारच आवडत आहे. पाहा त्यांचे फोटो. मिमीचार्वी म्हणजेच देवमाणूस या मालिकेतून लोकप्रिय झालेली मायरा. धनश्री कडगावर सुंदर मराठमोळ्या वेशात दिसून येत आहे. चार्वी देखील सुंदर पारंपरिक वेशात दिसून येत आहे. मायरा सध्या मालिकेत दिसत नाही. मात्र मालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. मिमीचार्वीचे पारंपरिक शुट तिच्या चाहत्यांना फारच आवडत आहेत. लहानग्या चार्वीची मोठी फॅनफॉलोइंगही आहे. याशिवाय चार्वीने अनेक जाहीरातींतही काम केलं आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक सुंदर फोटो शेअर होत असतात.