मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: डेअरी चालवणाऱ्या बापाचा लेक झाला अभिनेता; रवी किशनने असा केला होता संघर्ष

HBD: डेअरी चालवणाऱ्या बापाचा लेक झाला अभिनेता; रवी किशनने असा केला होता संघर्ष

अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनी त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष करत यश संपादन केलं होतं. पाहा त्यांच्याविषयी खास गोष्टी.

अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनी त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष करत यश संपादन केलं होतं. पाहा त्यांच्याविषयी खास गोष्टी.

अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनी त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष करत यश संपादन केलं होतं. पाहा त्यांच्याविषयी खास गोष्टी.

मुंबई 17 जुलै : अभिनेते रवी किशन यांनी (Ravi Kishan) आज अनेक भाषांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असला तरी त्यांची सुरुवात फारच कठीण काळातून झाली होती. तर मुंबईत फिल्मी करिअर करायला येण्यासाठी ही त्यांच्याकडे पैसे नव्हते.

रवी किशन यांचा जन्म 17 जुलै 1969 ला मुंबईतच झाला होता. पण किशन यांच्या वडिलांना डेरी व्यवसाय करायचा होता त्यासाठी ते आपल्या गावी जौनपुरला जावं लागलं होत. व संपूर्ण कुटुंब तिथेच राहू लागलं. पण रवी किशन यांना अभिनयात विशेष रस होता. पण त्यांच्या वडिलांना ही गोष्ट फार खटकत होती. तर आपल्या मुलानेही डेरी व्यवसायात च हातभार लावावा अस त्यांना वाटत होतं.

View this post on Instagram

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

त्यावेळी रवी किशन यांचा परिवार आर्थिक संकटातून जात होता. पण किशन यांना अभिनेता व्हायचं होतं. तेव्हा त्यांनी आपल्याच आईकडून 500 रुपये घेतले व मुंबई गाठली. मुंबईतील त्यांच्या घरी जिथे ते आधी चाळीत राहत होते तिथे जाऊन ते राहू लागले.

निक जोनसच्या clean shave वर बायको क्लीन बोल्ड; प्रियांकाची प्रतिक्रिया पाहाच

हाती काम नव्हतं, तर राहण्याचा ही नीट ठिकाणा नव्हता. त्यामुळे चित्रपटात काम मिळवण्यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला. अशावेळी त्यांना 1992 साली एका बी ग्रेड चित्रपटात काम मिळालं. पीतांबर असं या चित्रपटाचं नाव होत. त्यानंतर ही त्यांना फारसे चित्रपट मिळत नव्हते. पण तेरे नाम या बॉलिवूड चित्रपटानंतर त्यांना मोठी प्रसिध्दी मिळाली होती.

View this post on Instagram

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

त्यानंतर मुक्ति, शेयर बाजार, अग्नि मोर्चा अशा चित्रपटांत त्यांनी काम केलं. याशिवाय अनेक भाषांमध्ये ही त्यांनी काम केलं. तर मुंबईत आता त्यांनाच डुप्लेक्स apartment (Duplex apartment) घर आहे ज्यात 11 बेडरूम आहेत. असं आलिशान घर त्यांनी खरेदी केलं आहे. याशिवाय ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार देखील आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Ravi Kishan