मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sharad Kelkar-Keerti Gaekwad यांची प्यारवाली लव्हस्टोरी; 'या' मालिकेच्या सेटवर पहिली भेट अन् पहिलं प्रेम

Sharad Kelkar-Keerti Gaekwad यांची प्यारवाली लव्हस्टोरी; 'या' मालिकेच्या सेटवर पहिली भेट अन् पहिलं प्रेम

Sharad kelkar birthday : शरद केळकर अभिनयाप्रमाणेच त्याच्या लव्हस्टोरीमुळे देखील चर्चेत असतो.

Sharad kelkar birthday : शरद केळकर अभिनयाप्रमाणेच त्याच्या लव्हस्टोरीमुळे देखील चर्चेत असतो.

Sharad kelkar birthday : शरद केळकर अभिनयाप्रमाणेच त्याच्या लव्हस्टोरीमुळे देखील चर्चेत असतो.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 07 ऑक्टोबर : शरद केळकर (Sharad Kelkar) आणि कीर्ती गायकवाड (Keerti Gaekwad)  यांना टीव्ही जगतातील क्यूट कपल म्हणून सर्वजण ओळखतात. अभिनयाच्या जीवावर दोघांनीही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. शरद केळकरने हिंदीसोबत मराठीतदेखील अभिनयाची छाप सोडली आहे. शरद आणि कीर्ती दमदार अभिनयाप्रमाणेच त्यांच्या लव्हस्टोरीमुळे (Sharad Kelkar ANd Keerti Gaekwad Love Story) देखील चर्चेत असतात. जितका संघर्ष त्यांनी आयुष्यात केला आहे तितकीच रंजक आणि सुंदर त्यांची लव्हस्टोरी आहे. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल अशीच आहे. आज शरद केळकरचा हॅपीवाला वाढदिवस आहे म्हणूनच आपण या क्युट कपलची प्यारवाली लव्हस्टोरी जाणून घेणार आहे. शरद आणि कीर्तीचे पहिली भेट शरद आणि कीर्ती यांची पहिली भेट 2004 साली 'आक्रोश' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या सेटवर किर्तीला पाहताच शरद तिच्या प्रेमात पडला होता. यानंतर या दोघांची भेट जवळ जवळ चार पाच महिन्यानंतर 'सिंदूर तेरे नाम का' आणि 'सात फेरे' या हिंदी मालिकेच्या सेटवर झाली. या दरम्यान, दोघांच भेटणे वाढले व कालांतराने यांच्यातील जवळीकता देखील वाढली. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. वाचा : Aai Kuthe Kay Karte : ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी; म्हणाली, 'हिंमत असेल तर...' पहिल्या भेटीतच शरद किर्तीच्या पडला होता प्रेमात पहिल्या भेटीतच शरद कीर्तीच्या प्रेमात पडला होता आणि तेव्हापासून तो तिला त्याचा लकी चार्म मानत होता. शरदने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कीर्तीची भेट झाल्यानंतर त्याला 'सिंदूर तेरे नाम का' आणि 'सात फेरे' या प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका साकरण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे मला प्रसिद्धी मिळाल्याचे देखील त्याने सांगितले होते.
एका मुलाखती दरम्यान शरदने त्याच्या लव्ह लाईफविषयी सांगितलं होतं. शरद म्हणाला होता की, कीर्तीसोबत चार पाच महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनाही वाटत होती की आम्ही दोघे एकमेकांसाठी बनलो आहे. यासाठीच आम्ही लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघंही मराठी असल्याने आमच्या लग्नात कसलीच अडचण आली नाही. काही महिन्याच्या रिलेशनशिपनंतर 2005 मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले. यानंतर 2014 मध्ये हे दोघे आई बाब झाले. त्याचं लहानसं त्रिकोणी कुटुंब आहे. त्यांना एक लहानशी मुलगी आहे. तिचे नाव केशा असून शरद आणि कीर्ती या दोघांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. तीन दिवस चाललं होतं लग्न कीर्तीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होते की, त्यांचे लग्न मराठी रीतीरिवाजानुसार झालं आणि ते तीन दिवस चालले होते. ती लग्नात इतकी थकली होती की तिला मध्येच लिंबू सरबत (इलेक्ट्रॉल) प्यावं लागलं होतं. लग्नाच्या आठवणी सांगताना कीर्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. वाचा : Mrunmayee Deshpande ने रिक्रिएट केला बालगंधर्व यांचा लुक, पाहा Photos व्हॉईस ओव्हरच्या स्वरूपात मिळाली ओळख शरद केळकरने हिंदी मालिका तसंच मराठी चित्रपट यासोबतच बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपटांमध्ये आवाजाच्या जोरावर व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून ओळख निर्माण केली आहे. सर्वांना आश्चर्य वाटेल की, शरद केळकरने 'बाहुबली' च्या हिंदी डबिंगमध्ये प्रभासचा आवाज दिला आहे. एवढंच नाही तर त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी डबिंगमध्येही आपला आवाज दिला आहे. शरद दमदार अभिनय आणि दमदार आवाजामुळे चर्चेत असतो त्याचप्रमाणे तो फिटनेससाठी देखील चर्चेत असतो.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, TV serials

पुढील बातम्या