मुंबई, 06 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘आई कुठे काय करते’ **(Aai Kuthe Kay Karte Latest Episode)**या मालिका टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत सुरू असलेल्या कथानकाप्रमाणे (Aai Kuthe Kay Karte Latest Update) अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोटानंतर संजनाने घराचा ताबा घेतला आहे. परंतु, संजना अरुंधतीची जागा कधीही घेऊ शकत नाही याची जाणीव देशमुख कुटुंबीय तिला वारंवार करून देत असतात. अरुंधती माहेरी राहायला गेल्याने संजनाने **(Arundhati And Sanjana)**मोकळा श्वास घेतला होता. परंतु, पुन्हा एकदा अरुंधतीला देशमुखांच्या घरात पाहून संजनाचा पार चढणार आहे. आता पुन्हा अरुंधती आपल्या मुलांसाठी संजनासमोर उभी ठाकणार आहे. याचा संजना कसा सामना करणार तसेच अरूंधतीचे हे नवीन रूप पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. देशमुखांच्या घरी राहण्यावरून वारंवार अरूंधतीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. अनिरुद्धसोबतच्या घटस्फोटानंतर अरुंधती देशमुखांच्या घरातच का राहते, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडत होते. आता या सगळ्यानंतर गणेश विसर्जनानंतर अरुंधती अखेर डोंबिवलीला राहाण्यास गेली आहे. तिच्या घऱातून जाण्यामुळे संजनाला आनंद झाला आहे. मात्र मालिकेच्या पुढील भागात अरुंधती मुलांना भेटण्यासाठी घरी आलेली दाखवण्यात येणार आहे. मग काय नेहमीप्रमाणे अरूंधतीला घऱात पाहून संजनाचा तिळपापड होणार यात काही शंकाच नाही. मग यावरूनच या दोघींच्यात जोराचे भांडण होणार आहे. वाचा : ‘रंग माझा वेगळा’ मधील दीपाचा ग्लॅम अवतार पाहून चाहते म्हणताहेत- परमसुंदरी! यावेळी संजना अरुंधतीला माझ्या घरात येऊ नकोस असं सांगताना दिसणार आहे. त्यावर संजनाला सडेतोड उत्तर देत अरुंधती तिला हिम्मत असेल तर मला घरात येण्यापासून अडवून दाखव अशी धमकी वजा इशारा देताना दिसणार आहे. माझी मुलं या घरात राहतात त्यामुळे मला या घरात येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही असं अरुंधती संजनाला सांगताना दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संजनाकडे कोणताच पर्याय नसणार आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. इतकेच नाही तर या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. मात्र सध्या ही मालिका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मालिकेत अरूंधतीचा प्रेमळ आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव सर्वांनाच आवडत असला तरी सध्या दाखवण्यात येत असलेले कथानक प्रेक्षकांना फारसे पटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मालिकेला विरोध होताना दिसत आहे.आई कुठे काय करते मालिकेविरोधात प्रेक्षक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता ही मालिका बंद करा, काय फिरवली आहे मालिका, कुणी तरी या अरुंधतीला थांबवा, ही अरुंधती काय लेडी जेम्स बॉन्ड आहे का ?, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. वाचा : शेवटी आईच काळीज! Aryan Khan साठी गौरी बर्गर घेऊन पोहोचली, पण… आता अरुंधतीचे हे बदलेले रूप पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उत्सुक आहेत. सोशल मीडियावर देखील या भागाची चर्चा रंगलेली आहे. यासोबतच पुन्हा देशमुखांच्या घऱात अरूंधतीला पाहून नेटकरी यावर कशा प्रतिक्रिया देणार याची देखील उत्सुकता आहे.