दिशा पाटनीचे जबरदस्ती काढले फोटो, बॉडीगार्डने धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ VIRAL

दिशा पाटनीचे जबरदस्ती काढले फोटो, बॉडीगार्डने धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ VIRAL

दिशा पाटनीचा आणखी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. बॉलीवूड कलाकारांना Paparazzi ला कायम सामोरं जावं लागतं. दिशा पाटनीचा देखील Paparazzi बरोबरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर देखील तिचे खूप व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. दिशा पाटनीचा आणखी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. बॉलीवूड कलाकारांना Paparazzi ला कायम सामोरं जावं लागतं. त्यावेळी अनेकदा या कलाकारांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर येतात. दिशा पाटनीचा देखील Paparazzi बरोबरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिचा बॉडीगार्ड एका Paparazzi बरोबर भांडताना दिसत आहे. एवढच नाही तर त्याने या फोटोग्राफरला धक्काबुक्की देखील केली आहे.

(हेही वाचा-BIGG BOSS मधील 'या' स्पर्धकाने केला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा बनाव)

झालं असं की ‘मलंग’ स्टार दिशा पाटनीला नेहमीप्रमाणे काही फोटोग्राफर्सनी घेरलं होतं. फोटो काढत असताना त्यांच्यापैकी असणारा कुतूब याला दिशाचा फोटो काढणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्याने दिशाच्या कारच्या दुसऱ्या बाजुने जाऊन दिशाचा फोटो काढण्याचा प्रयत्न झाला. जबरदस्तीने काही फोटो काढण्याचा त्याने प्रयत्न केल्यामुळे दिशाच्या बॉडीगार्डचा पारा चढला. पण त्यावेळी दिशाचा बॉडीगार्ड आणि या फोटोग्राफरमध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांमध्ये बाचाबाची झाली. दिशाच्या बॉडीगार्डने या फोटोग्राफरला धक्काबुक्की देखील केली. दिशा पाटनीने मात्र यातून काढता पाय घेतला. दिशा नक्कीच फोटोसाठी पोज देण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती क्षणार्धात गाडीमध्ये बसून गेली.

Viral Bhayani या Paparazzi इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. बॉडीगार्डच्या या वर्तवणुकीमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर दिशाच्या मॅनेजरने या फोटोग्राफरची माफी मागितल्याचं समजतं आहे.

नुकताच दिशा पाटनीचा मलंग सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आदित्य रॉय कपूरबरोबर असणाऱ्या या सिनेमानी बॉक्स ऑफीसवर बऱ्यापैकी कमाई केली आहे. दिशा आता सलमान खान (Salman Khan) बरोबर तिच्या नवीन सिनेमात दिसणार आहे. 'राधे' असं या सिनेमाचं नाव असून रणदीप हुडा देखील यामध्ये दिसणार आहे

First published: February 24, 2020, 6:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading