कोरोनाग्रस्त चिनी फॅन्ससाठी आमीर खान चिंताग्रस्त, VIDEO द्वारे दिला संदेश

कोरोनाग्रस्त चिनी फॅन्ससाठी आमीर खान चिंताग्रस्त, VIDEO द्वारे दिला संदेश

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं याकरता जगाच्या कानाकोपऱ्यातून चिनी बाधंवांसाठी प्रार्थना केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं याकरता जगाच्या कानाकोपऱ्यातून चिनी बाधंवांसाठी प्रार्थना केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे चीनसह आजुबाजुच्या देशातील अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान या संदर्भात बॉलीवूड अभिनेता आमीर खान याने देखील त्याच्या चीनमधील फॅन्सकरता एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये आमीर खान आपल्या चीनमधील फॅन्सना धीर देताना दिसत आहे. आमीरने चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे चिंता व्यक्त केली आहे. ‘कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मला खूप दु:ख झालं आहे. ज्यांनी त्यांच्या आप्तजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोक व्यक्त करतो. मला खात्री आहे की प्रशासनाकडून सर्व गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात येत असतील. यावेळी आपण काळजी आणि खबरदारी घेण्याचं काम करू शकतो. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणही आवश्यक आहे.’ असा मेसेज आमीरने आपल्या चिनी फॅन्ससाठी शेअर केला आहे.

त्याचप्रमाणे लवकरच चीनमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा आमीरने या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ‘तुमची काळजी घ्या, सुरक्षित आणि स्वस्थ राहा’ असंही आमीर या व्हिडीओद्वारे म्हणाला आहे.

कोरोनामुळे परिस्थिती गंभीर

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोना व्हायरसमुळे मरम पावलेल्यांची संख्या 2600 वर पोहोचली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता जास्त आहे. 76 हजारांहून अधिक चिनी बांधवांना कोरोना व्हायरसने ग्रासलं आहे.

First published: February 24, 2020, 4:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading