मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Happy B'day Amitabh Bachchan: 'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे जया-अमिताभ यांच्या जीवनातून दूर झाल्या रेखा

Happy B'day Amitabh Bachchan: 'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे जया-अमिताभ यांच्या जीवनातून दूर झाल्या रेखा

सुरुवातीच्या काळात एक-एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही, आणि आज ते बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. अभिनयसोबत अमिताभ यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली.

सुरुवातीच्या काळात एक-एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही, आणि आज ते बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. अभिनयसोबत अमिताभ यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली.

सुरुवातीच्या काळात एक-एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही, आणि आज ते बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. अभिनयसोबत अमिताभ यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन आज त्यांचा 79वा वाढदिवस (Amitabh Bachchan 79th Birthday) साजरा करत आहेत. 11 ऑक्टोबर 1942 मध्ये अलाहबादमध्ये बिग बींचा जन्म झाला. लहानपणापासून इंजिनियर आणि एयरफोर्समध्ये जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिग बींनी फिल्म इंडस्ट्रीनध्ये पाऊल ठेवलं. सुरुवातीच्या काळात एक-एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही, आणि आज ते बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. अभिनयसोबत अमिताभ यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली. मात्र एका रात्रीनंतर रेखा अचानक अमिताभ यांच्या जीवनातून गायब झाल्या. पण त्या रात्री नेमकं काय झालं ज्यामुळे रेखांनी हा निर्णय घेतला.

तो काळ होता 1977चा जेव्हा रेखा सिंदूर भरून गर्भवती असल्याच्या चर्चा मीडियामध्ये पसरवून अमिताभ यांच्यसोबतच नातं जगजाहिर करण्याच्या तयारीत होत्या. तर दुसरीकडे जया बच्चन मात्र शांतपणे तुटत चाललेला आपला संसार सावरायचा प्रयत्न करण्यात गुंतल्या होत्या. अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याची चर्चा त्यावेळी जोरदार सुरू होती. मात्र जया यांनी यावर कधीच कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांतपणे आपलं काम करत राहिल्या.

रिव्हर्स ऑर्डरमध्ये शूट करण्यात आला होता रणबीर कपूरचा 'रॉकस्टार'; जाणून घ्या....

एक दिवस जेव्हा अमिताभ एका सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं मुंबईच्या बाहेर गेले होते. त्यादिवशी जया यांनी रेखांना फोन केला. रेखा यांना वाटलं की आता जया त्यांच्याशी भांडतील. त्यांना अनेक गोष्टी ऐकवतील. पण जया यांनी असं काहीही केलं नाही. जया यांनी रेखा यांना रात्री घरी जेवायला येण्याचं निमंत्रण दिलं. रेखांना वाटलं घरी गेल्यावर जया त्यांचा अपमान करतील. रात्री जेव्हा रेखा नटून थटून जया यांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी जया अत्यंत साध्या कपड्यांमध्ये होत्या. त्यांनी रेखा यांचं स्वागत केलं. गप्पा मारल्या. दोघींनी एकत्र जेवण केलं.

जयांनी रेखा यांना संपूर्ण घर, गार्डन दाखवलं त्यांचा आदर सत्कार केला. डिनरनंतर जेव्हा रेखा परत निघाल्या त्यावेळी त्यांना निरोप देताना जया यांनी त्याना एक गोष्ट सांगितली ज्यामुळे रेखा यांच्या पायाखालची जमिन सरकली. जया म्हणाल्या, 'काहीही झालं तरी मी अमितला सोडणार नाही.'

आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांचे आहेत कौटुंबिक संबंध! पाहा काय आहे दोघांचं....

दुसऱ्या दिवशी या डिनरच्या प्रचंड चर्चा झाल्या उलट सुलट बातम्या छापल्या गेल्या. मात्र याविषयी ना जया कधी काही बोलल्या ना रेखा. पण त्या एका रात्रीनंतर अमिताभ यांचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं. रेखा यांनी अमिताभ यांच्या जीवनातून दूर जाण्याचा निर्णय घेतला. कारण रेखा यांना समजल होतं, की जया यांना या अफेअर बद्दल माहित असलं तरीही त्या कुटुंब वाचवण्यासाठी कधीच काही बोलणार नाहीत.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Rekha