मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रिव्हर्स ऑर्डरमध्ये शूट करण्यात आला होता रणबीर कपूरचा 'रॉकस्टार'; जाणून घ्या किस्सा

रिव्हर्स ऑर्डरमध्ये शूट करण्यात आला होता रणबीर कपूरचा 'रॉकस्टार'; जाणून घ्या किस्सा

२०११ मध्ये 'रॉकस्टार' हा चित्रपट आला होता. इम्तियाज अलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता रणबीर कपूरने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

२०११ मध्ये 'रॉकस्टार' हा चित्रपट आला होता. इम्तियाज अलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता रणबीर कपूरने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

२०११ मध्ये 'रॉकस्टार' हा चित्रपट आला होता. इम्तियाज अलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता रणबीर कपूरने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,10ऑक्टोबर- 'रॉकस्टार' (Rockstar) या चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांचं मन जिंकलं होतं. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली होती. मात्र या चित्रपटाचं एक वेगळेपण आहे. या चित्रपटाचं शूटिंग क्लायमॅक्स पासून सुरु झालं होतं. त्यानंतर चित्रपटाचं स्टार्टींग शूट करण्यात आलं होतं.

" isDesktop="true" id="616025" >

२०११ मध्ये 'रॉकस्टार' हा चित्रपट आला होता. इम्तियाज अलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता रणबीर कपूरने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तर त्याची सह-कलाकार म्हणून अभिनेत्री नर्गिस फाखरी होती. या चित्रपटाने तरुणाईला भुरळ घातली होती. रणबीरच्या दमदार अभिनयाने चित्रपटाला एक विशिष्ट ओळख मिळवून दिली होती. चित्रपटात जनार्दन जाखर अर्थातच अभिनेता रणबीर कपूरला रॉकस्टार बनायचं असतं. मात्र त्याच्या कुटुंबाचं प्रचंड अपमान केलं जातं. तो हीर (नर्गिस फाखरी)नावाच्या मुलीला पसंत करत असतो. मात्र ती मुलगी त्याला दगा देते. या सर्व घटनांमुळे तो आपल्या स्वप्नांसाठी जास्तचं वेडा होतो. आणि नंतर तो एक मोठा रॉक्सस्टार बनतो. असं या चित्रपटाचं कथानक आहे.

(हे वाचा:'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाने वाढवलं होतं स्पेनचं टुरिझम! वाचा अजब किस्सा)

'रॉकस्टार'मध्ये रणबीर कपूरचे लांब केस दाखवण्यात आले आहेत. त्याचा लूक एकदम रॉकस्टारला शोभेल असाच होता. साधारणपणे प्रत्येक चित्रपटाचं शूटिंग सुरुवातीपासून क्लायमॅक्स असं शूट केलं जातं. मात्र या चित्रपटाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचं शूटिंग क्लायमॅक्स अर्थातच शेवटापासून करण्यात आलं होत. त्यानंतर चित्रपटाची सुरुवात शूट करण्यात आली होती. याचं मुख्य कारण होतं रणबीर कपूरचे केस. चित्रपटात सुरुवातीला रणबीर कपूरचे केस लहान दाखवण्यात आले आहेत. आणि नंतर मोठे केस दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे रणबीरचे केस मोठे असताना चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करून घेण्यात आला होता. आणि नंतर केस कट करून चित्रपटाची सुरुवात शूट करण्यात आली होती.

(हे वाचा:आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांचे आहेत कौटुंबिक संबंध! पाहा काय आहे दोघांचं....)

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच रणबीरच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं. चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. संगीतकार ए. आर.रहमान यांची ती संगीतबद्ध केली होती. या चित्रपटाने अभिनेता रणबीर कपूरला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. तसेच अभिनेता रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी हि फ्रेश जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

First published:

Tags: Entertainment, Ranbir kapoor