मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hansika Motwani : सुफी नाईटमध्ये हंसिका-सोहेलची रॉयल एन्ट्री; राजेशाही थाटात पार पडणार विवाहसोहळा

Hansika Motwani : सुफी नाईटमध्ये हंसिका-सोहेलची रॉयल एन्ट्री; राजेशाही थाटात पार पडणार विवाहसोहळा

हंसिका-सोहेल

हंसिका-सोहेल

450 वर्ष जुन्या किल्यात लग्न ते पूर्ण सोहळ्याचं होणार लाईव्ह स्ट्रीमिंग; हंसिकाच्या लग्नाबद्दल रंजक गोष्टी जाणून घ्या

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 03 डिसेंबर :अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. काल रात्री 2 डिसेंबरला या जोडप्याची संगीत सेरेमनी पार पडली. यावेळी सुफी नाईटचे आयोजन करण्यात आले होते. आता या फंक्शनचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये हंसिका खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच हंसिकाचा भावी पती सोहेलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हंसिका सोहेलचा हात धरून एन्ट्री करताना दिसतेय.

हंसिका मोटवानीचा  २ डिसेंबरला मेहंदी सोहळा पार पडला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले. काहींमध्ये ती डान्स करताना तर काहींमध्ये सोहेल तिच्या शेजारी बसलेला दिसला. इतकंच नाही तर अभिनेत्री सोबत नाचत होती आणि क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. आता या सोहळ्यानंतर ती आज संगीत सोहळ्यामध्ये या जोडप्याने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा - Samruddhi Kelkar : मालिकेचा निरोप घेताना समृद्धी केळकरला अश्रू अनावर, म्हणाली 'न कळत...'

अभिनेत्रीचा नवरा असलेल्या सोहेल कथुरियाने स्वतः इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हंसिकाने सुंदर गोल्डन रंगाचा शरारा परिधान केला आहे. तसेच, बेगम साहिबाप्रमाणेच दागिने देखील तिच्या लुकमध्ये शोभा वाढवत आहेत. त्याचबरोबर नवाबी कुर्ता-पायजमामध्ये सोहेलसुद्धा शोभून दिसतोय. दोघेही त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना पाहून हसत आहेत. या व्हिडीओला  सोहेलने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया' हे गाणे ठेवले आहे. हा व्हिडीओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हंसिका मोटवानीचे लग्न जयपूरच्या 450 वर्ष जुन्या मुंडोटा किल्ल्यात होणार आहे. या लग्नात फक्त तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार आहेत. 2 डिसेंबरला सकाळी मेहेंदी आणि रात्री सुफी नाइट्सचे आयोजन करण्यात आले होते. 3 डिसेंबरला संगीताचे आयोजन केले जाईल आणि शेवटी 4 डिसेंबरला हे दोघे अधिकृतपणे एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. एवढाच नाही तर या दोघांचं संपूर्ण लग्न OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर लाईव्ह पाहता येणार आहे. यानंतर पोलो मॅच आणि कॅसिनो पार्टीचेही नियोजन करण्यात आले आहे. बिझनेसमन सोहेलला दोन वर्षे डेट केल्यानंतर अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकणार आहे.

जयपूरला पोहोचण्यापूर्वी हंसिका मोटवानीने ग्रीसमध्ये तिच्या मित्रांसोबत बॅचलर पार्टीही केली होती. यात तिच्यासोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून राजस्थानमध्ये या लग्नाची तयारी सुरू होती. हंसिकाही दोन महिन्यांत अनेकदा राजस्थानला आली होती. आता अखेर उद्या म्हणजेच रविवारी हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment