मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Samruddhi Kelkar : मालिकेचा निरोप घेताना समृद्धी केळकरला अश्रू अनावर, म्हणाली 'न कळत...'

Samruddhi Kelkar : मालिकेचा निरोप घेताना समृद्धी केळकरला अश्रू अनावर, म्हणाली 'न कळत...'

समृद्धी केळकर

समृद्धी केळकर

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. डॅशिंग आयपीएस ऑफिसर ते शांत, संयमी सून अशी कीर्तीची दोन्ही रूपं प्रेक्षकांना भावली होती. मात्र आता समृद्धीदेखील कीर्तीचा निरोप घेताना भावुक झाली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 03 डिसेंबर : स्टार प्रवाहवरील सगळ्यात जुनी मालिका म्हणजे 'फुलाला सुगंध मातीचा'. या मालिकेने पहिल्या पाच मालिकांमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. कीर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. पण आता आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून  कीर्ती आणि शुभम आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.  या मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. डॅशिंग आयपीएस ऑफिसर ते शांत, संयमी सून अशी कीर्तीची दोन्ही रूपं प्रेक्षकांना भावली होती. मात्र आता समृद्धीदेखील कीर्तीचा निरोप घेताना भावुक झाली आहे.

समृद्धीने सोशल मीडियावर मालिकेतील कीर्तीसाठी एक खास पोस्ट केली आहे. कीर्तीने आपल्याला भरपूर काही शिकवलं असं म्हणत तिने तिचे आभार मानले आहेत. तिने लिहिलंय कि, ''किर्ती...कला, अभिनय क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक मुलीचा ड्रीम रोल असावा असं हे विविधरंगी पात्र...विविधरंगी याचसाठी म्हटलं कारण या पात्राला अनेक छटा पैलू आहेत , होते. सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारी , समंजस , घरातल्यांना आणि बाहेरच्यांनाही समजून सांभाळून घेणारी , नाती जपणारी,स्वप्नपूर्तीचा ध्यास असणारी.. मात्र कोणताही अन्याय सहन न करणारी.. स्वतःचं स्पष्ट मत वेळोवेळी मांडणारी , स्वतःवर पूर्ण विश्वास असणारी अशी ही कीर्ती साकारताना नकळत खऱ्या आयुष्यात पण खूप काही शिकायला मिळालं.''

हेही वाचा - 'आरे आंदोलक फालतू-बोगस'; सुमीत राघवनचं वादग्रस्त ट्विट, Video वरुनही नागरिक संतापले

पुढे तिने म्हटलंय कि, ''romantic sequence तर मालिकांमधे करायला मिळतातच पण कीर्ती IPS officer असल्यामुळे मालिकेतल्या एका टिपीकल सूनेचं काम करता करता फायटिंग सिक्वेन्स , वेगवेगळ्या physical activities , military training , अगदी बंदूक चालवायला शिकेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकायला ,करायला मिळाल्या. व्यावसायिक आयुष्यात तर मला किर्तीने खूपपपपपप दिलंच आहे. पण वैयक्तिक आयुष्यात पण मला तिनं अजाणतेपणी बरंच शिकवलं आहे. कीर्तीचं आत्मविश्वासाने मुद्दे मांडणं , वेगवेळ्या लोकांना त्यांच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे सांभाळून घेणं आणि अवखळ असून देखील वेळ आली की संयमानं वागणं हे मी समृद्धी म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील आत्मसात करण्याचा , तसं वागण्याचा प्रयत्न करत आहेच.''

शेवटी ती म्हणतेय कि, किर्ती मी तुला कधीच नाही विसरू शकणार. तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ होतीस ,आहेस आणि कायम राहशील.'' समृद्धीने लिहिलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील भावुक कमेंट केल्या आहेत. 'पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा', 'आम्ही तुला मिस करू' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मात्र मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत गेली. मालिकेत शुभमचा अपघात होतो. डोक्याला मार लागल्यानं शुभमचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो. कीर्ती सोडून घरातील सर्व सदस्यांना शुभम ओळखतो. कीर्ती कोण आहे हेच त्याला आठवत नाही. मालिकेत आलेल्या या ट्विस्टनंतर कथानकानं वेगळं वळण घेतलं. पण हा ट्विस्ट प्रेक्षकांना तेवढा पसंत पडला नव्हता. त्यातच आता मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment