Home /News /entertainment /

Hansal Mehta: 'कंगनासोबत काम करणं आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक'; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

Hansal Mehta: 'कंगनासोबत काम करणं आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक'; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

(kangana ranaut) आपल्या बेधडक वक्तव्याने कायम चर्चेत असणाऱ्या कंगना रणौतसोबत एक चित्रपट करणं ही माझी चूक होती असं एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचं म्हणणं आहे.

    मुंबई 6 जुलै:बॉलिवूडमध्ये कंगना रणौत (Kangana Ranaut) नावाचं वादळ सतत घोंघावत असतं. कंगनाने इतक्या वर्षात अनेक सुपरहिट चित्रपट देऊन स्वतःचं अस्तित्त्व निर्माण केलं आहे. सध्याच्या काळात कंगना आपल्या अनेक वक्तव्यांमुळे संकटात सापडताना दिसते. राजकीय बाबींवर, बॉलिवूडमधील अनेक गोष्टींवर आपली मतं ठामपणे मांडण्यात कंगना अग्रेसर आहे असं अनेकदा दिसून आलं आहे. कंगनाने ‘स्कॅम 1992’ चे दिग्दर्शक आणि मेकर हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्यासोबत एक चित्रपट केला होता. हंसल मेहता यांनी कंगनाबद्दल एक हैराण करणारा खुलासा केला आहे. हंसल मेहता आणि कंगना रणौत एका प्रोजेक्टसाठी एकत्र आले होते ज्या सिनेमाचं नाव ‘सिमरन’ असं होतं. त्या सिनेमादरम्यान कंगनाने दिग्दर्शनाची सगळी सूत्र हातात घेतल्याचं सुद्धा बोललं जात होतं. या गोष्टीने हंसल मेहता बरेच नाराज होते आणि सिनेमा सपशेल फेल गेल्यावर त्यांनी अनेकदा याचा उल्लेख सुद्धा केला होता. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी सिमरन या (Hansal Mehta on Kangana Ranaut) सिनेमाला त्याच्या आयुश्यातली एक चूक म्हणून संबोधलं आहे. हंसल Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “पुन्हा त्या सिनेमाबद्दल काय बोलावं? माणसाच्या आयुष्यात काही चुका होतात त्याला काय करणार? मी त्यातून पुढे गेलो.” कंगनाने शूटिंगसह अनेक ठिकाणी ढवळाढवळ केली अशा बातम्या आहेत तिने एडिट मध्ये ही ढवळाढवळ केली का? हे ही वाचा-Samantha Ruth Prabhu: समंथाची बॉलिवूडमध्ये एंट्री! साऊथच्या या ब्यूटीफुल अभिनेत्रीचा पहिला पगार होता इतका असं निवेदक त्यांना विचारतो तेव्हा ते सांगतात, “तिने एडिटमध्ये लक्ष घातलं नाही कारण त्यात संकलन करायला काही नव्हतंच. तिने जेवढं शूट करून घेतलं होतं तेवढंच मटेरियल होतं.” यापुढे जाऊन हंसल कंगनाची तारीफ सुद्धा करतात, “ती एक खूप चांगली आणि टॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिच्याकडे क्षमता आहे पण तिने स्वतःभोवती एक मर्यादेचं कुंपणं घालून ठेवलं आहे. तुम्ही कायम स्वतःबद्दल किंवा तुम्हाला सगळ्या भूमिका ज्या पद्धतीने दाखवायच्या आहेत तशा पद्धतीने सिनेमे बनवू शकत नाही. आत्ता तिचं एक गाणं प्रदर्शित झालं ज्यात ती स्वतःला woman on fire म्हणते. तुम्ही स्वतःबद्दल स्वतःहूनच असं बोलू शकत नाही. तुम्हाला जसं बनायचं आहे तेच तुम्ही कायम सिनेमात दाखवू शकत नाही. पण तिच्या निवडीला मी वाईट म्हणणार नाही. ती आजही आघाडीची अभिनेत्री आणि उत्तम कलाकार आहे. आमचं समीकरण नीट झालं नाही. तिच्यासोबत काम करणं ही मोठी चूक होती.” कंगनाचा धाकड हा सिनेमा सपशेल आपटल्यानंतर आता ती येत्या काळात कोणत्या तेजस या सिनेमात दिसणार आहे.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Bollywood News, Director, Film, Kangana ranaut

    पुढील बातम्या