जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Guess Who : फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? महाराष्ट्रातील तरुणांच्या हृदयावर करतेय 'राज'!

Guess Who : फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? महाराष्ट्रातील तरुणांच्या हृदयावर करतेय 'राज'!

गौतमी पाटीलचा बालपणीचा फोटो

गौतमी पाटीलचा बालपणीचा फोटो

सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोमध्ये चिमुकलीची महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता आहे. ती आता मोठी झाली असून फोटोमध्ये दिसत असलेल्या तिच्या आईची डिट्टो कॉपी आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जून : बालपणीचे फोटो प्रत्येकासाठी खास असतात. आपण बालपणी कसे दिसायचो, कसे कपडे घालायचो, आपल्या बालपणी आपले आई-वडील कसे दिसायचे हे जाणून घेण्याची सर्वांची इच्छा असते. प्रत्येकाकडे आपल्या बालपणीचा एक तरी फोटो असतोच आणि तो प्रत्येकासाठी खास असतो. सध्या सोशल मीडियावर असेच बालपणीचे फोटो पोस्ट करण्याचा नवा ट्रेंड सुरू आहेत. मोठ मोठ्या सेलिब्रेटी देखील आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात. कधी कधी काही फोटोमधील चिमुकली बाळ नेमकी कोण आहेत हे ओळखणं देखील कठीण होतं. मग त्यांच्या आई-वडिलांच्या फोटोवरून बऱ्याचदा फोटोतील चिमुकली बाळ कोण आहेत याचा अंदाज लावला जातो. असाच एक फोटो समोर आला आहे ज्यात आपल्या आईच्या हातात एक गोड चिमुकली दिसत आहे. पण ही नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडतोय. आजवर आलिया भट्ट पासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. पण या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली फार खास आहे. सध्या सर्वत्र तिचीच चर्चे पाहायला मिळत असते. तिच्या नावाचा इतका बोलबाला आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तरूण तिच्यावर फिदा आहे. पण फोटोतील ही चिमुकली आहे तरी कोण? फोटो नीट पाहा आणि बघा ओळखता येतंय का? हेही वाचा -  Samir Chaoughule : प्रेक्षकांना खळखळून हसवताना समीर चौघुलेंकडून झाली मोठी चूक; मागावी लागली सर्वांसमोर माफी फोटोमधील ही चिमुकली मुलगी कोण आहे हे अजूनही तुम्हाला ओळखता आलेलं नाही का? मग तुमच्यासाठी आणखी  काही टिप्स आम्ही तुम्हाला देतो. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोमध्ये चिमुकलीची महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता आहे. ती आता मोठी झाली असून फोटोमध्ये दिसत असलेल्या तिच्या आईची डिट्टो कॉपी आहे.  मागील काही दिवसांपासून ती सतत चर्चेत आहे. ती उत्तम डान्सर आहेच पण शिवाय तिचा नवा सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात

फोटोमधील चिमुकल्या मुलीला तुम्ही अजूनही ओळखलं नसेल तर आता ही शेवटची हिंट. ही चिमुकली कमालीची धाडसी आहे. बालपणापासून तिनं खडतर परिस्थितीचा सामना करून कला क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. तिच्या आईवर तिचं खूप प्रेम असून एकटी लेक आईचा सांभाळ करत आहे. ती ज्या क्षेत्रात काम करतेय तिथे आजवर तिच्यावर अनेक टीका झाल्यात, तिच्या व्हिडीओवर आणि नाचावर अनेकांची आक्षेप घेतलाय. पण तरीही ती तिची कला सादर करतेय.

News18लोकमत
News18लोकमत

वर दिलेल्या अनेक हिंटमधून तुम्हाला कळलं असेल की फोटोमधील चिमुकली ही दुसरी तिसरी कोणी नसून अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी सबसे कातिल गौतमी पाटील आहे. शॉक बसला का? पण हो ही गौतमी पाटीलचं आहे. गौतमीनं स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवर आईबरोबरचा हा फोटो शेअर केला आहे.  “माझं जग, आई आणि मी” असं म्हणत तिनं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला गौतमीच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. गौतमी हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते हे दिसून आलं आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेम व्यक्त केलं आहे. आई आणि तुझ्यात काहीच फरक नाही सेम दिसतात तुम्ही, अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्यात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात