मुंबई, 04 जुलै : बॉलिवूडमध्ये 80 आणि 90 च्या दशकात विविध चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे गुड्डी मारुती. गुड्डी मारुतीने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तिने अनेक चित्रपटात काम केलं होतं. तिने त्या काळातील जवळजवळ सगळ्याच स्टारसोबत अभिनय केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. दरम्यान, आता नुकतंच केलेल्या एका खुलास्यात तिने अनेक कलाकारांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. पण तिने ममता कुलकर्णी बद्दल केलेल्या एका खुलास्याची सगळीकडे चर्चा होत आहे. अभिनेत्री गुड्डी मारुतीने आता 30 वर्षांनंतर ‘वक्त हमारा है’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगितलं आहे. त्याचवेळी तिने त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी बद्दल देखील अनेक खुलासे केले आहेत. गुड्डी मारुतीने ममता तिच्यासोबत गैरवर्तन करत असे तसंच ती थोडी उद्धट होती, असं सांगितलं आहे.
गुड्डी मारुतीने ‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय की, ‘मी एका मासिकात काहीतरी सांगितलं होतं ,जे चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं. ममता कुलकर्णीने त्या मासिकातील काही लेख वाचून माझ्यासोबत गैरवर्तन केले होते.’ या दोघीजणी 1993 मध्ये आलेल्या ‘वक्त हमारा है’ या सिनेमात एकत्र काम करत होत्या. तसेच यावेळी बोलताना गुड्डीने ‘ममता खूपच घमंडी आणि गर्विष्ठ होती’ असा खुलासा देखील केला आहे. साऊथच्या सुपरस्टारचा तिसरा संसारही मोडणार? ‘या’ गोष्टींमुळं रंगलीय चर्चा गुड्डीने सांगितले की, ‘ममता कुलकर्णी ही अगदी थोड्या काळासाठीच स्टार झाली होती. दोघींनी ‘पोलिसवाला गुंडा’, ‘बेकाबू’ आणि ‘आशिक आवारा’मध्ये एकत्र काम केले होते. जेव्हा गुड्डी मारुतीला विचारले गेले की सेटवर कोणी त्याला कनिष्ठ किंवा कमी अभिनेता म्हणून न्यायचा प्रयत्न केला? प्रतिसादात अभिनेत्रीने ममता कुलकर्णीशी संबंधित एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, ‘मी कॉमेडियन होते, त्यामुळे माझी कोणाशीही स्पर्धा नव्हती. पण ममता कुलकर्णीची गोष्ट वेगळी होती. तिने माझ्याबद्दल एक लेख वाचला होता… असं होतं की तुम्ही पत्रकाराला काहीतरी बोलता आणि ते काहीतरी वेगळे लिहितात. ममताने माझा असाच एक लेख वाचला आणि ती दुखावली गेली. तिने ती गोष्ट चुकीच्या पद्धतीने घेतली. त्याचा राग तिच्या मनात होता.’ असा खुलासा गुड्डीने केला आहे.