मुंबई, 04 जुलै :कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आता साऊथच्या एका सुपरस्टारच्या वैयक्तिक आयुष्याची आता चर्चा सुरु झाली आहे. या अभिनेत्याचा तिसरा संसारही मोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता आहे पवन कल्याण. पण त्याच्या लग्नाबाबत अशी चर्चा का होतेय जाणून घ्या. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार पवन कल्याण त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. दरम्यान, 51 वर्षीय पवन कल्याणने वैयक्तिक आयुष्यात तीनदा लग्न केलं आहे. आता काही मीडिया रिपोर्टनुसार, पवन कल्याण त्याची तिसरी पत्नी अॅना लेझनेवापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती आहे. पवन कल्याण पत्नी अॅना लेझनेवापासून वेगळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अॅना लेझनेवा आपल्या मुलांसह दुबई किंवा सिंगापूरमध्ये राहते तर अभिनेता भारतात राहत आहे.
पवन कल्याणने रशियन मॉडेल अॅना लेझनेवासोबत 2013 मध्ये तिसरं लग्न केलं होतं. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. आता हे कपल विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत. पवन कल्याणची तिसरी पत्नी अॅना लेझनेवा सिंगापूर किंवा दुबईत त्याच्यापासून वेगळी राहत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. ती आपल्या मुलांसह रशियाला गेली असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या वृत्तांची पुष्टी झालेली नाही. अनेक महत्वाच्या समारंभामध्ये पवन कल्याणसोबत अॅना लेझनेवा दिसली नाही तेव्हापासून या चर्चा सुरु झाल्या आहेत. Rekha : ‘एकदा नातं जोडलं गेलं की…’ तब्बल 19 वर्षानंतर वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टच बोलली रेखा वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या एंगेजमेंटच्या निमित्ताने अॅना लेझनेवा पती पवन कल्याणसोबत दिसली नाही असे सांगितले जात आहे. याशिवाय अॅना राम चरण आणि उपासना यांच्या मुलीच्या बारशाला देखील उपस्थित नव्हती. तेव्हापासून तिच्या आणि पवन कल्याणच्या विभक्त झाल्याच्या बातम्यांना बळ मिळाले आहे. मात्र, या वृत्तांवर पवन कल्याणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पवन कल्याणने 1997 मध्ये नंदिनीसोबत पहिले लग्न केले आणि 2008 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर 2009 मध्ये त्यांनी रेणू देसाई यांच्याशी लग्न केले आणि 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पवन कल्याणने 2013 मध्ये अॅना लेझनेवाशी लग्न केले. आता पवन कल्याण आणि अॅना लेझनेवा वेगळे झाल्याची बातमी समोर येत आहे.